Shivsena News: भाजपच्या कूटनीतीचा हा विजय; ECI ने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर नाना पटोलेंचा मोदी-शाहंवर हल्लाबोल

Nana Patole On Shivsena News: शिवसेनेतील ठाकरे गटाचं चिन्ह काय याबाबत नार्वेकरांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.
Nana Patole
Nana PatoleSaam Tv
Published On

औरंगाबाद: निवडणुक आयोगाने शिवसेनेचं (Shivsena) धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. काल, शनिवारी निवडणुक आयोगाने हा निर्णय दिला. तसेच ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांना धनुष्यबाण या चिन्हाऐवजी निवडणुक आयोगाकडे उपलब्ध असलेले चिन्ह निवडण्याचे आदेश निवडणुक आयोगाने दिले आहेत. याबाबत कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपला जबाबदार धरत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. हा भाजपच्या कूटनीतीचा विजय आहे असं नाना पटोले औरंगाबादमध्ये म्हणाले आहेत. (Shivsena Latest News)

Nana Patole
Shivsena: निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर मिलिंद नार्वेकरांचं सडेतोड ट्विट, म्हणाले आमचे चिन्ह...

केंद्रीय निवडणुक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर नाना पटोलेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, अमित शाह, नरेंद्र मोदी आणि भाजपच्या कूटनीतीचा हा विजय आहे. आणि त्यामुळे शिवसेनेचे पक्षाचिन्ह आणि पक्षाचं नाव गोठवण्यात आलं असा आरोप त्यांनी केला. अशा पद्धतीने जर देश चालत असेल तर हे लोकशाहीसाठी घातक आहे असेही पटोले म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ज्या पद्धतीने सगळ्या हालचाली सुरू होत्या असं होईल असं वाटत होतं आणि दुर्दैवाने झालं असं. नाना पटोले म्हणाले स्वतः न्याययंत्रणाच आम्हाला वाचवा म्हणून रस्त्यावर येते तर पक्षांचे काय? असं म्हणत स्वतः जेपी नड्डा म्हणाले होते की छोटे पक्ष संपणार आहे तिच हे रणनीती दिसत असल्याचेही नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, शिंदे गट आणि ठाकरे गटाला धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाने आयोगाकडे धनुष्यबाण चिन्हासाठी कागदपत्रे सादर केली होती. तसंच शिवसेना नाव वापरण्याबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना शिंदे सेना आणि शिवसेना ठाकरे सेना असं नाव दोन्ही गट वापरू शकतात, अशीही माहिती समोर आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले 'हे' आदेश

  • दोन गटांपैकी कोणीही शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही.

  • दोन्ही गटांपैकी कोणालाही "धनुष्य आणि बाण" हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.

  • दोन्ही गट त्यांच्यासाठी निवडतील अशा नावांनी ओळखले जातील.

  • संबंधित गट,त्यांना हवे असल्यास,त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात

  • दोन्ही गटांना ते निवडतील वेगवेगळी चिन्हे देखील दिली जातील. निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून निवड करावी लागेल.

  • सध्याच्या पोटनिवडणुकासाठी दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी एक वाजेपर्यंत सादर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • (i) त्यांच्या गटांच्या नावांना ज्याद्वारे आयोगा मान्यता देईल आणि त्यासाठी

    प्राधान्य क्रमाने तीन पर्याय द्या,त्यापैकी कोणीही असू शकतो.

  • (ii) उमेदवारांना जे चिन्ह वाटप केले जाऊ शकतात, जर असतील तर

    संबंधित गटामध्ये तीन मुक्त चिन्हांची नावे सूचित करू शकतात.

  • त्यांच्या पसंतीचा क्रम,त्यापैकी कोणालाही त्यांच्या उमेदवारांना वाटप केले जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com