Khopoli Mangesh Kalokhe killing Case saam tv
मुंबई/पुणे

खोपोलीत शिंदे शिवसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या; अजित पवार गटाचे सुधाकर घारे, भरत भगत यांच्यासह १० जणांवर गुन्हा

khopoli mangesh kalokhe Killing Case investigation : खोपोलीतील मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे यांच्यासह दहा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Saam Tv

खोपोली नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे, जिल्हा प्रवक्ता भरत भगत यांच्यासह एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून निवडून आलेल्या उमेदवार मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची आज, शुक्रवारी हत्या झाली. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. काळोखे कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यात नकार दिला आहे.

दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, पक्षाचे जिल्ह्याचे प्रवक्ता भरत भगत यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रत्यक्ष हत्या आणि कट रचणारे अशा एकूण १० जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सुधाकर घारे हे सुनील तटकरे यांचे समर्थक असून त्यांनी कर्जत विधानसभेत शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत अवघ्या पाच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता.

काळोखेंना रस्त्यात गाठले

मंगेश काळोखे हे आज सकाळी सातच्या सुमारास मुलांना शाळेत सोडून घरी परतत होते. त्यावेळी अज्ञातांनी त्यांना रस्त्यात गाठले. त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर काळ्या रंगाच्या एका वाहनातून आले होते. काळोखे आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर त्यांनी हल्ला चढवला. जखमी झालेल्या काळोखेंना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंदवला. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण आहे. त्यांच्या हत्येच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी काळोखेंच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा हात असल्याचा आरोप केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईसाठी ठाकरेंच्या दोन पिढ्या मैदानात, प्रचाराची धुरा नव्या ठाकरेंकडे

Maharashtra Politics : महाविकास आघाडीला मोठा धक्का; वसई-विरारमध्ये ठाकरे गट आघाडीतून बाहेर

Maharashtra Live News Update: - मंत्री भरत गोगावले यांना आंदोलन करताना घातला घेराव

महाराष्ट्राचा बिहार होतोय? क्रूर हत्येनं खोपोली हादरली

कार्यकर्ता पॅटर्न! महायुती, महाआघाडीनंतर तिसऱ्या आघाडीची उडी; कोल्हापुरात राजकारण फिरलं

SCROLL FOR NEXT