पुण्यातील खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे.
खेवलकर यांचे वकील विजय ठोंबरे यांनी आरोप केला की ही कारवाई आधीच ठरवलेली होती.
पोलीस रेकी करून मुद्दामहून व्हिडिओ शुटिंग करून ही कारवाई केली, असा दावा त्यांनी केला.
केवळ ४ जण असलेल्या पार्टीला "रेव्ह पार्टी" म्हणणं बालिशपणा असल्याचंही वकिलांनी सांगितलं.
पुण्यातील खराडी येथे झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरसह सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. पुणे सत्र न्यायालायने दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. न्यायालयात सुनावणी पार पडल्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी याप्रकरणी धक्कादायक खुलासा केलाय.
एका फ्लॅटमध्ये ४ जणांच्या पार्टीला रेव्ह पार्टी म्हणणं बालिशपणा आहे. प्रांजल खेवलकर यांना अडकविण्याचा डाव असून हे सर्व पोलिसांनी घडवून आणले, असा आरोप वकील विजय ठोंबरे यांनी केलाय.
पुणे पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री पुण्यातल्या खराडी भागामध्ये एका फ्लॅटवर छापा टाकला होता. या फ्लॅटवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश पोलिसांनी केला. या प्रकरणात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांनाही अटक करण्यात आली. खेवलकर यांच्यासह ६ जणांना पोलिसांनी आज न्यायालयात हजर केलं. पुणे सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान सुनावणी झाल्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनी धक्कादायक खुलासा केलाय.
डॉ. प्रांजल खेवलकर यांना याआधीही तीनदा अडकविण्याचा प्रयत्न झाला होता.आताही त्यांना अडविण्यात येत असल्याचा आरोप वकील विजय ठोंबरे यांनी केलाय. तसेच न्यायालयाने सुनावलेल्या पोलीस कोठडीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत. या प्रकरणातील काहीजण गुन्हेगार आहेत म्हणून प्रांजल खेवलकर यांना कोठडी दिली जाते का? असा सवाल त्यांनी केलाय. तसेच प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याच प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन केलं नव्हतं.
ब्लड सँपल आल्यानंतर सर्व काही सिद्ध होईल, असा दावाही वकिलांनी केलाय. या पार्टीत प्रांजल खेवलकर यांचा कोणताच रोल नाही. एका फ्लॅटमध्ये चार लोकांमध्ये करण्यात आलेल्या पार्टीला रेव्ह पार्टी म्हणणं हा बालिशपणा आहे. पोलिसांनी हे सर्व घडवून आणलं असावं. खेवलकर ज्या हॉटेलमध्ये होते तिथे रेकी करण्यात आली होती. त्यानंतर अडकविण्याचा डाव आखण्यात आलाय. याआधीही २ वेळा खेवलकर यांच्याविरोधात ट्रॅप रचला गेला होता, असा आरोप वकील विजय ठोंबरे यांनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.