Kalyan Dombivli Municipal Corporation News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan : ठाकरे सेनेच्या 'त्या' तीन नेत्यांना ४८ तासांचा अल्टिमेटम; नगरसेवक पद रद्द करण्याचा इशारा

Kalyan Dombivli Municipal Corporation : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत उद्धव सेनेचे तीन नॉट रिचेबल नगरसेवक अडचणीत आले आहेत. गटात सहभागी न झाल्याने त्यांना ४८ तासांत खुलासा देण्याची अंतिम नोटीस देण्यात आली असून अन्यथा अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

Alisha Khedekar

  • कल्याण डोंबिवली महापालिकेत तीन नगरसेवक नॉट रिचेबल

  • गट स्थापनेत सहभागी न झाल्यामुळे पक्षाकडून अंतिम नोटीस

  • ४८ तासांत खुलासा देण्याचा आदेश

  • उत्तर न दिल्यास अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून मोठी बातमी समोर आली आहे. पालिकेत उबाठा गटाचे निवडून आलेले नॉट रिचेबल नगरसेवक कोणत्याही गटा सामील न झाल्याने त्यांना अंतिम इशारा देण्यात आला आहे. तसेच नगरसेवकांचे सदस्य पद रद्द करण्याची प्रक्रिया कोकण विभागीय आयुक्तांना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचा खुलासा येत्या ४८ तासात देण्यात यावा असे जिल्हा प्रमुखांकडून सांगण्यात आले आहे.

महापालिका निवडणुकीत उद्धव सेनेचे ११ नगरसेवक निवडून आले. निडणूकीचा निकाल लागताच उद्धव सेनेचे नगरसेवक राहूल कोट, मधूर म्हात्रे, किर्ती ढोणे, स्वप्नीनी केणे हे चार नगरसेवक नॉट रिचेबल झाले. महापौर पदाच्या निवडणूकीत किर्ती ढोणे हजर झाल्या. मात्र कोट, म्हात्रे, केणे हे तीन नगरसेवक गैरहजर राहिले. पक्षाने त्यांचे गट स्थापन केले. ही गट स्थापन करण्याची प्रक्रिया कोकण विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. मात्र कोकण विभागीय आयुक्तांनी उद्धव सेनेचे निवडून आलेले ११ नगरसेवक असे नमूद केले आहे.

११ नगरसेवकांनी त्यांची सदस्य नोंदणी केली आहे. त्यामुळे जे ३ नगरसेवक कोणत्याही गटात सहभागी झाले नसले तरी ते उद्धव सेनेच्या गटात असल्याचे कोकण विभागीय आयुक्तांनी स्पष्ट करावे. मत्र कोकण विभागीय आयुक्तांनी त्यावर उत्तर देताना ते कोणत्याही गटात सहभागी नाहीत हे स्पष्ट केले. मात्र ते उद्धव सेनेच्या गटात गणले जातील असे स्पष्ट केलेले नाही.

या पश्चात पक्षाचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी नगरसेवकांना अंतिम नोटिस बजावली आहे. त्यांनी गट स्थापनेच्या प्रक्रियेत सहकार्य केले नाही. ही कृती पक्षाच्या विरोधात आहे. या तीन सदस्यांनी स्वइच्छेने पक्षाचा त्याग केला असे मानले जाऊ शकते. पक्षाने या बाबत वारंवार विचारणा केली. तसेच खुलासा मागितला. त्याचा खुलासा ३ नगरसेवकांनी दिलेला नाही. ही अंतिम नोटिस असल्याने ४८तासात खुलासा केला नाही तर कोकण विभागीय आयुक्तांकडून नगरसेवक अपात्रेतीची कारवाई केली जाईल असा या अंतिम नोटिसद्वारे इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv Crime: जमिनीच्या वादानं आणलं भावकीत वैर; चुलत्यानं २१ वर्षीय पुतण्याला संपवलं

Maharashtra News Live Update:भोंदू राजेंद्र गडगे याला घेऊन पोलिस पोहचले दत्तधाम आश्रमात...

Fatty Liver Detox: काय सांगता? दारु न पिताही लिव्हर होतो खराब, 'या' ७ घातक सवयी कारणीभूत ठरतात

Crime News: महिलेने घेतला तरूणाच्या प्रायव्हेट पार्टचा चावा; घरी पोहोचताच व्यक्तीचा मृत्यू

५ कोटींच्या MDMA गोळ्या जप्त, महिला सप्लायर अटकेत; मुंबईत खळबळ

SCROLL FOR NEXT