kdmc Saam Tv News
मुंबई/पुणे

KDMC Action: रूग्णालयातील कचरा रस्त्यावर! केडीएमसीनं दिला थेट इशारा, दंडात्मक कारवाई होणार

Kalyan Dombivli Municipal Corporation action on Hospital: रुग्णालयीन कचरा रस्त्यावर फेकणाऱ्या रुग्णालयावर केडीएमसीनं दंडात्मक कारवाई केली आहे. केडीएमसीनं आधी आवाहन केलं. नंतर कारवाई केली.

Bhagyashree Kamble

रुग्णालयीन कचरा रस्त्यावर फेकणाऱ्या रुग्णालयावर केडीएमसीनं दंडात्मक कारवाई केलीय. कल्याण पश्चिमेकडील गांधारी परिसरातील वृंदावन रुग्णालयावर केडीएमसीनं दंडात्मक कारवाई केली आहे.

नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असलेला रुग्णालयीन कचरा रस्त्यावर टाकू नये, असं आवाहन केडीएमसीनं केलं होतं. मात्र, नियमाचा भंग केल्यामुळे केडीएमसीनं दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

रुग्णालयीन घनकचरा नागरी आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. मात्र, हा कचरा सर्रास रस्त्यावर फेकण्यात येत आहे. या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. असं असतानाही अनेक डॉक्टर रुग्णालयात वापरलेली इंजेक्शन, सीरिंज कचऱ्यात फेकतात. ज्याचा सामान्य नागरीकांना धोका आहे.

कल्याण पश्चिमेकडील गांधारी परिसरातील वृंदावन रुग्णालयाकडून रुग्णालयात वापरले जाणारे इंजेक्शन, आयव्ही बॉटल, काढलेले प्लास्टर, कापूस, बँडेज, वापरलेल्या आणि न वापरलेल्या सीरिंज असा कचरा रस्त्यावर टाकल्याचं आढळून आलं आहे.

या प्रकरणी केडीएमसीचे उपायुक्त अतुल पाटील यांनी वृंदावन रुग्णालयावर दंडात्मक कारवाई केली आहे. रुग्णालयाने त्यांचा रुग्णालयीन कचरा हा रस्त्यावर टाकू नये, असे आवाहन केडीएमसीकडून करण्यात आली होती. मात्र, तरीही रूग्णालय रूग्णलयातील कचरा सर्रास रस्त्यावर फेकण्यात येत होते.

नियमाचा भंग केल्यामुळे केडीएमसीनं इशारा दिला आहे. हे असंच सुरू राहिल्यास रुग्णालय विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपायुक्त पाटील यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

SCROLL FOR NEXT