Crime News: वडिलोपार्जित शेतीवरून वाद, मुलाच्या डोक्यात सैतान शिरला, आईचा घेतला जीव

Son Kills Mother Over Land Dispute: वडिलोपार्जित शेतीवरून एका नराधम मुलानं आपल्या जन्मदात्या आईलाच संपवलं आहे. कुराडीने वार करत आईची हत्या केली आहे.
Crime
CrimeSaam Tv News
Published On

संदीप भोसले, साम टीव्ही

आई आणि लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. वडिलोपार्जित शेतीवरून नराधमानं आपल्याच जन्मदात्या आईवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना लातूरच्या अहमदपूर तालुक्यातीव महादेववाडीत घडली आहे.

जन्मदात्या आईची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीनं मृतदेह घरातीलच पाण्याच्या हौदात फेकला. मात्र, गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलंय.

लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील महादेववाडी एक संतापजनक घटना घडली आहे. रागाच्या भरात जन्मदात्या आईवर मुलाने डोक्यात धारदार शस्त्राने वार करत त्यांनी हत्या केली आहे. विक्रम चामे (वय वर्ष ३५) असे नराधम मुलाचे नाव आहे. तर, वनिता प्रकाश चामे (वय वर्ष ५५) असे मृत महिलेचे नाव आहे.

Crime
Beed News: कारागृहात वाल्मिक कराडचे होतायेत लाड, पोलीसच देत आहेत VIP ट्रिटमेंट; देशमुख कुटुंबाचा आरोप

वडिलोपार्जित शेती नावावर करून देत नसल्यामुळे त्याने आईची हत्या करायचं ठरवलं. आई गाढ झोपेत होती. त्याने हीच संधी साधत आईच्या डोक्यात धारदार कुराडीने वार केले. वार इतके जोरात बसले की, यात जन्मदात्या आईचा जागीच तडफडून मृत्यू झाला. आईची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी हौदाचा वापर केला.

Crime
Pune Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! पुण्यात राहत्या घरासमोर भावाला संपवलं, कारण फक्त एवढंच...

आरोपी मुलाने मृतदेह घरातीलच पाण्याच्या हौदात फेकला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चौकशी केली असता, आरोपी मुलाने जन्मदात्या आईचा खून केला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com