Beed News: कारागृहात वाल्मिक कराडचे होतायेत लाड, पोलीसच देत आहेत VIP ट्रिटमेंट; देशमुख कुटुंबाचा आरोप

Valmik Karad VIP Treatment: वाल्मिक कराडला तुरूंगात मिळत आहे व्हिआयपी ट्रिटमेंट. पोलिसांच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर. गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट.
Walmik Karad news update
Walmik Karad NewsSaamTv
Published On

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तीन महिने उलटले. या हत्या प्रकरणामुळं राज्यातील वातावरण ढवळून निघालं. मात्र, अद्यापही दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही.

या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडला तुरूंगात व्हिआयपी ट्रिंटमेंट मिळत असल्याची माहिती समोर आलीय.

तसेच तुरंगातील व्हिआयपी ट्रिंटमेंटच्या अनुषंगाने पोलिसांची चौकशी होणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिलीय. आरोपीला मिळत असलेल्या व्हिआयपी ट्रिटमेंटमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

वाल्मिक कराडसह इतर आरोपींना बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप गत काही दिवसात केला जात होता. मात्र, पोलिसांच्या एका अहवालात वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या या अहवालात, तारीख आणि वेळेसह वाल्मिक कराडला कशी आणि कोणती सुविधा मिळत आहे, याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच कराडला मदत करणाऱ्यांची माहिती देखील समोर आली आहे.

Walmik Karad news update
Amravati Crime : मित्रासोबत बाहेर जाताना घेरलं, माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; मस्साजोगचं लोण हळूहळू इतर जिल्ह्यात

ही माहिती समोर आल्यानंतर देशमुख कुटुंबाकडून जेल प्रशासनाकडे तक्रार केली जाणार आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज मिळण्याची मागणी देशमुख कुटुंबाकडून होत आहे. कारागृहातील अधिकारी बक्सार मुलाणी आणि कर्मचारी ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, सुधाकर मुंडे हे सहकार्य करत असल्याचं म्हटलं जात आहे.

Walmik Karad news update
Adhar Card: आधार कार्डचे १ नाहीतर ५ जबरदस्त फायदे, सरकारी काम होईल झटपट

आरोपी वाल्मिक कराडला मिळत असलेल्या व्हिआयपी ट्रिटमेंटची दखल न घेतल्यास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याची माहिती देऊन तक्रार केली जाणार असल्याचं देशमुख कुटुंबाने सांगितलंय. या धक्कादायक माहितीनंतर परिसरात नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com