Kalyan Dombivli Municipal Corporation Saam tv
मुंबई/पुणे

KDMC : केडीएमसीमधील धक्कादायक प्रकार उघड, महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप; वरिष्ठ लिपिक निलंबित

Kalyan Dombivli Municipal Corporation : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील एका वरिष्ठ लिपिकावर महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप झाला असून त्याला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Alisha Khedekar

  • केडीएमसीत महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग प्रकरण

  • आरोपी वरिष्ठ लिपिक भूषण पाटील निलंबित

  • मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ लिपिकाने महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याच्या गंभीर आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात लिपिक भूषण पाटील याला अखेर निलंबित करण्यात आले असून त्याच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलात कार्यरत असलेल्या भूषण पाटील याने एका महिला शिपाई कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत, सेटलमेंटच्या नावाखाली शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने सुरुवातीला वरिष्ठांकडे तक्रार केली होती. मात्र, तक्रारीची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे.

त्यानंतर संबंधित लिपिकाकडून आपल्याला कामावरून कमी केल्याचा मेसेज पाठवण्यात आला आणि कारवाई थांबवण्यासाठी अश्लील मागणी करण्यात आल्याचा दावा महिलेने केला आहे. अखेर त्रस्त झालेल्या महिलेने धैर्य दाखवत मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी या प्रकरणाची पुष्टी करत आरोपीला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती दिली.

या घटनेची गंभीर दखल घेत केडीएमसी प्रशासनाने अंतर्गत चौकशी सुरू करत भूषण पाटील याला निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडूनही या प्रकरणाची चौकशी प्रस्तावित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच ‘ई’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त यांनीही वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, आरोपी भूषण पाटील याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत हे आरोप जाणीवपूर्वक खोटे असल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

झाड कोसळून आणखी दोघांचा मृत्यू; मुंबईकरांचा वाली कोण? मुर्दाड महापालिकेला कधी जाग येणार?

Pune School: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

School Holiday: मोठी बातमी! ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह नवी मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुट्टी

Pune News: कात्रज तलावाच्या कठड्यावरून खाली पडला, ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- चिपळूणच्या वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडली

SCROLL FOR NEXT