Kalyan Dombivli Muncipal Corporation News Saam tv
मुंबई/पुणे

KDMC : केडीएमसीचा गलथान कारभार! झोपडपट्टीला २.३३ लाखांची नोटीस; विधवा महिलेचं घर जप्त करण्याचा इशारा

Kalyan Dombivli Muncipal Corporation Titwala News : केडीएमसीच्या कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टिटवाळ्यातील कातकरी पाड्यात राहणाऱ्या आदिवासी विधवा महिलेला 2.33 लाख रुपयांचा मालमत्ता कर भरण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • टिटवाळ्यातील आदिवासी विधवा महिलेला 2.33 लाखांचा मालमत्ता कर

  • अत्यंत गरीब परिस्थितीत राहणाऱ्या महिलेला जप्तीची धमकी

  • केडीएमसीच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह

  • श्रमजीवी संघटना पीडित महिलेच्या पाठीशी ठाम

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कारभारातील गळथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी मयत आणि सेवेतून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाल्याचा प्रकार ताजा असतानाच, आता टिटवाळ्यातील कातकरी पाड्यात राहणाऱ्या एका आदिवासी विधवा महिलेला तब्बल २ लाख ३३ हजार रुपयांचा मालमत्ता कर भरण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे.

महापालिकेच्या मालमत्ता कर वसुली विभागाने ही नोटीस पाठवली असून, ठरावीक कालावधीत कर न भरल्यास संबंधित महिलेच्या झोपडीवर जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या नोटीसमुळे सदर महिला प्रचंड मानसिक तणावात सापडली आहे.

टिटवाळा हा परिसर केडीएमसी हद्दीत येतो आणि प्रभाग क्रमांक एकच्या कार्यालयांतर्गत समाविष्ट आहे. टिटवाळ्यातील गणेश विद्यालयाजवळ असलेल्या कातकरी पाड्यात सुमित्रा उर्फ पारु बळीराम कातकरी ही आदिवासी विधवा महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या या महिलेच्या झोपडीला महापालिकेने थेट २.३३ लाख रुपयांचा मालमत्ता कर आकारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सुमित्रा कातकरी या विधवा असून घरात कमावता पुरुष नाही. तीन मुलांचा उदरनिर्वाह त्या इतरांच्या घरात धुणीभांडी करून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर चालवतात. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या रकमेचा कर भरणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. झोपडी विकली तरीही १० हजार इतकी रक्कम उभी राहणार नाही, अशी हतबल प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

महापालिकेने पाठविलेल्या या नोटीसमुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आधीच गोंधळलेल्या निर्णयांमुळे चर्चेत असलेल्या केडीएमसीने आता एका गरीब आदिवासी विधवा महिलेवर कराचा बोजा टाकून अजब कारभाराचा आणखी एक नमुना समोर आणल्याची टीका होत आहे.

या प्रकरणाचा श्रमजीवी संघटनेने तीव्र निषेध केला असून, केडीएमसी प्रशासनाला जाब विचारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित आदिवासी महिलेच्या पाठीशी संघटना ठामपणे उभी राहणार असल्याचेही श्रमजीवी संघटनेने जाहीर केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT