संगमनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
घराजवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याची झडप
ग्रामस्थ संतप्त; मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा
परिसरात भीती व तणावाचे वातावरण
महाराष्ट्रात बिबट्याने सर्वत्र धुमाकूळ घातलेला असताना आता अहिल्यानगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. संगमनेरमधील एका ४ वर्षीय चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गावकऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करत नाहीत तोपर्यंत चिमुकल्याचा मृतदेह हातात घेणार नाही असा कडक इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील चिखली रस्त्यालगत शेतकरी सूरज दिलीप कडलग यांची वस्ती आहे. काल सायंकाळी ते गोठ्यातील जनावरांना चारा टाकत होते, तर आजी गवताचे ओझे घेऊन गोठ्यात गेली होती. त्याचवेळी चार वर्षीय चिमुकला सिद्धेश सूरज कडलग हा घराच्या दारात उभा होता.
याचवेळी अंधारात गिन्नी गवतात दबा धरून बसलेला बिबट्या दबक्या पावलांनी सिद्धेश जवळ आला. सिद्धेश जवळ येताच त्याने त्याच्यावर हल्ला केला. बिबट्याच्या क्रूर हल्ल्यामुळे सिद्धेश जोरात किंचाळला आणि जागीच कोसळला. सिद्धेशच्या आवाजाने त्याचे वडील आणि आजी गोठ्यातून धावत बाहेर आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सिद्धेश जागीच ठार झाला.
या हल्ल्यानंतर सुरजच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला. शिवाय या घटनेने गावातील ग्रामस्थ संतप्त झाले असून जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार केले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पावित्रा घेतल्याने वातावरण तणावपूर्ण झाले आहे. दरम्यान सुरजच्या अपघाती जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.