Viral Video : "हनिमूनपेक्षा महत्त्वाचा मेस्सी..." कोलकात्यातील दाम्पत्याची सोशल मीडियावर चर्चा

Lionel Messi India Tour 2025 Kolkata stadium : लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर येताच कोलकात्यात फुटबॉल चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. एका चाहत्याने तर मेस्सीसाठी हनिमूनही रद्द केल्याची घटना चर्चेत आहे.
Viral Video : "हनिमूनपेक्षा महत्त्वाचा मेस्सी..." कोलकात्यातील दाम्पत्याची सोशल मीडियावर चर्चा
Lionel Messi Fan Honeymoon CancelSaam Tv
Published On
Summary
  • लिओनेल मेस्सी GOAT इंडिया टूर 2025 साठी भारतात दाखल

  • बंगालमधील चाहत्याने मेस्सीसाठी हनिमून रद्द केला

  • कोलकात्यात मेस्सीचे जंगी स्वागत

  • स्टेडियममध्ये प्रचंड गर्दीमुळे गोंधळाची परिस्थिती

स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर आला आहे. मेस्सी भारतात येणार म्हणून त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अशातच पश्चिम बंगालमधील एका मेस्सी चाहत्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चाहत्याचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले होते. त्या हनिमूनसाठी तिकिटं बुक केले होते, शिवाय तसे प्लॅनिंग देखील केले होते. मात्र मेस्सी येणार या बातमीने त्याने त्याचा हनिमून रद्द केला असल्याचे समोर आले आहे.

लिओनेल मेस्सी त्याच्या GOAT इंडिया टूर २०२५ साठी भारत दौऱ्यावर आला असून त्याच्या येण्याने फुटबॉल चाहत्यांचा आनंद द्विगुणित झालेला पाहायला मिळतो आहे. कोलकात्यामध्ये मेस्सीला पाहण्यासाटी अलोट गर्दी झाली होती. मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांनी शुक्रवारी रात्री पासूनच विमानतळ परिसरात गर्दी केली होती. आज सकाळी कोलकात्यात त्याचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. या दरम्यान ANI या वृत्तवाहिनीला दिलेल्या बाईटनुसार एका जोडप्याने म्हटलं आहे की, त्यांचं काही दिवसांपूर्वी लग्न झालं.

Viral Video : "हनिमूनपेक्षा महत्त्वाचा मेस्सी..." कोलकात्यातील दाम्पत्याची सोशल मीडियावर चर्चा
Pune : पुणेकरांनो लक्ष द्या! 'एफसी' रोडवरील वाहतुकीत मोठे बदल; वाचा पर्यायी मार्ग

लग्नानंतर ते दोघेही हनिमूनसाठी जाणार होते. मात्र मेस्सी भारतात येणार हे ऐकल्यावर त्यांनी त्यांची हनिमून ट्रिप कॅन्सल केली. या महिलेने मुलाखतीत म्हटले आहे की, "मेस्सी भारतात येणार ही हनिमून पेक्षा महत्त्वाची बाब आहे. आम्ही २०१० पासून त्याला फॉलो करत आहोत आणि त्याला आता भेटण्याचा योग्य आला आहे. त्यामुळे . मी आता खूप आनंदी आहे. हनिमूनला आम्ही केव्हाही जाऊ शकतो, मात्र मेस्सी ला भेटण्याची आणि बघण्याची संधी पुन्हा येणार नाही."

मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांनी विवेकानंद युवा भारती स्टेडियममध्ये प्रचंड गर्दी केली. यादरम्यान परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. परिस्थिती पाहून मेस्सीने कार्यक्रमातून काढता पाय घेतला. मेस्सीला पाहण्यासाठी हजारो चाहते काही तासांपासून स्टेडियममध्ये होते. मेस्सी मैदानात आला अन् दहा मिनिटात निघून गेला. त्यामुळे चाहते संतापले त्यांनी स्टेडियममध्ये राडा घातला. त्यांनी बाटल्या फेकल्या अन् पोस्टरही फाडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com