Kalyan, Kalyan-Dombivli Municipal Corporation News saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Dombivli News: तक्रार करण्यासाठी आलेल्या दिव्यांगाला पालिकेच्या सुरक्षा रक्षकाचे संतापजनक उत्तर; नागरिकांकडून संताप व्यक्त

Kalyan Dombivli News: खड्ड्यांबाबत तक्रार करण्यास पालिकेत आलेल्या दिव्यांगाला सुरक्षा रक्षकाचे संतापजनक उत्तर

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Kalyan Dombivli News: खड्ड्यांच्या प्रश्नांवरून महापालिका प्रशासनावर चारही बाजूंनी टीका होत आहे. याच खड्ड्यांबाबत तक्रार करण्यास आलेल्या दिव्यांगाला तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का? आधी पत्र दे. पत्र दहा दिवसांनी अधिकाऱ्यांकडे येईल. त्यानंतर खड्डे बुजतील, अशी संतापनजक उत्तर केडीएमसीच्या सुरक्षा रक्षकाने दिल्याचे समोर आले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

केडीएमसीच्या सुरक्षा रक्षकाने दिव्यांगाला संतापजनक उत्तर दिल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.

खड्डे बुजवण्यासाठी हेल्पलाइन सुरू करणारे पालिका प्रशासन व प्रशासनातले अधिकारी कर्मचारी नागरिकांच्या सेवेप्रती किती उदासीन आहेत याचं उदाहरण आज पाहायला मिळालं आहे.

कल्याणजवळ असलेल्या बापगाव परिसरात राहणारा शुभम सिंग दोन दिवसापूर्वी आपल्या दुचाकीने कल्याणच्या दिशेने येत होता. मग गांधारी फुल ओलांडल्यानंतर रस्त्यावर असलेला खड्डा चुकवताना एका दुचाकी स्वाराचा तोल गेला व त्याने पाठीमागून येणाऱ्या शुभम यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात शुभम यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून गंभीर दुखापत झाली आहे.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शुभम यांनी थेट कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालय गाठले. त्यांनी गांधारी परिसरातील खड्डे बुजवण्याची मागणी करत शहर अभियंता व संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना भेटू दिले नाही.

सुरक्षा रक्षकाने तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का? आधी पत्र दिलेस का? असा सवाल करत आधी पत्र दे..पत्र दहा दिवसांनी अधिकाऱ्यांकडे येईल. त्यानंतर खड्डे बुजतील, असं संतापनजक उत्तर दिलं.

याबाबत बोलताना शुभम सिंग यांनी दोन दिवसांपूर्वी खड्ड्यांमुळे माझा अपघात झाला, आता पुन्हा कुणाचा अपघात होऊ नये यासाठी त्या ठिकाणचे खड्डे बुजवा हे सांगण्यासाठी महापालिकेत आलो. मात्र सुरक्षा रक्षकाने मला भेटू दिले नाही, उलट अपमानस्पद वागणूक दिल्याचे सांगितले. पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना खड्ड्यांबाबत काही देणे घेणे नसल्याचे आरोप केला आहे.

दरम्यान, खड्ड्यांची तक्रार हेल्पलाइनवर करण्याचे आवाहन पालिका प्रशासन करतेय. मात्र दुसरीकडे खड्ड्यांची तक्रार देण्यास पालिका मुख्यालयात आलेल्या नागरिकांना मात्र टोलवटवी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT