KDMC RERA Scam Saam Digital
मुंबई/पुणे

KDMC RERA Scam: रेरा फसवणूक प्रकरण, बिल्डरांपाठोपाठ केडीएमसी अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

KDMC RERA Scam News: कल्याण डोंबिवली शहरात महापालिकेच्या बनावट परवानगीच्या आधारे रेरा परवानग्या मिळवून 65 अनधिकृत इमारती उभारल्याचा प्रकार उघडकिस आला होता. याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी सुरू असून संबंधित बिल्डरांविरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आलेत.

Sandeep Gawade

अभिजित देशमुख

KDMC RERA Scam

कल्याण डोंबिवली शहरात महापालिकेच्या बनावट परवानगीच्या आधारे रेरा परवानग्या मिळवून 65 अनधिकृत इमारती उभारल्याचा प्रकार उघडकिस आला होता. याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी सुरू असून संबंधित बिल्डरांविरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आलेत. या इमारती शोधून महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली.

अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी शासनाने रेरा कायदा आणला मात्र कथित बिल्डर मंडळींनी यातून पळवाट शोधल्याचे कल्याण डोंबिवलीत उघड झाले. महापालिका हद्दीतील ६५ बिल्डरांनी खोट्या सही-शिक्क्यांचा वापर करून महापालिकेची बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासवून रेरा कडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविले. अनधिकृत इमारती उभारत बेकायदेशीर घरे नागरिकांना विकत त्यांची फसवणूक केली. याद्वारे रेरा, महापालिका, शासन , या तिन्ही सरकारी यंत्रणांसह नागरिकांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात संबंधित बिल्डरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे. दरम्यान महापालिकेने सर्वे करत या इमारती शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यापाठोपाठ आता महापालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याबाबत बोलताना अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे म्हणाले, सर्व्हे करत इमारती कुठे आहे ते शोधून काढलं ,त्यानंतर इमारतींवर कायदेशीर कारवाई करत अनधिकृत बांधकामे घोषित केली. 57 इमारतींवर तातडीने कारवाई करण्यात आली तर उरलेल्या इमारती एमएमआरडीए व एमआयडीसीच्या अखत्यारित येत असल्याने त्यांना देखील कारवाई करण्याच्या सूचना केल्या . तसेच या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करण्यात येईल यामध्ये कोण दोषी आहे, याची प्रोसेस का केली नाही, हा संपूर्ण प्रकार 2015 ते 2022 यादरम्यान झाल्याचं निदर्शनास आलं आहे. त्या दृष्टीने यात कोण दोषी आहे याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल - उदय सामंत

Mahad Tourism : धबधबे, धुके अन् डोंगररांगा; हिवाळ्यातील नंदनवन, 'येथे' ट्रेकिंग करताना मिळेल अविस्मरणीय अनुभव

Mardaani 3 : 'मर्दानी 3'साठी राणी मुखर्जीने घेतलं तगडं मानधन, 'या' अभिनेत्रीला मिळाली सर्वात कमी फी

पुणे हादरलं! आईनं २ लेकरांसह मृत्यूला कवटाळलं, नवऱ्याच्या त्या कृत्यानं माऊलीने उचलले टोकाचं पाऊल

Stomach acidity symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा पोटातील पित्त वाढतंय; अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी गॅस्ट्रो तज्ज्ञांचा सल्ला

SCROLL FOR NEXT