Kalyan Dombivli News Saam TV
मुंबई/पुणे

KDMC Action : मनसेचा धसका! केडीएमसी अ‍ॅक्शन मोडवर, स्टेशन परिसरातून सर्व अनधिकृत फेरीवाले हटवले

Kalyan Dombivli News : मनसेच्या इशाऱ्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने डोंबिवली (पूर्व) रेल्वे स्टेशन परिसरात मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई केली. अनधिकृत फेरीवाले हटवून परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला असून नागरिकांनी याचे स्वागत केले आहे.

Alisha Khedekar

मनसेच्या इशाऱ्यानंतर केडीएमसीची अतिक्रमणविरोधी धडक कारवाई

डोंबिवली (पूर्व) स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला

अनधिकृत स्टॉल, शेड हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला

नागरिक आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी कारवाईचं स्वागत केलं

संघर्ष गांगुर्डे, कल्याण प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने डोंबिवली (पूर्व) रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर सकाळपासून मोठी कारवाई सुरू केली. स्टेशनबाहेरील फुटपाथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून संपूर्ण परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला. मनसेच्या इशाऱ्यानंतर केडीएमसीला जाग आली असल्याचे चित्र दिसत आहे.

सहायक आयुक्त भरत पवार यांच्या नेतृत्वाखाली ग आणि फ प्रभागातील ही कारवाई करण्यात आली. पोलिस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईदरम्यान अनेक अनधिकृत शेड, स्टॉल आणि फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. काही ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत शेड जमीनदोस्त करण्यात आले.

सहायक आयुक्त यांनी सांगितले की, फेरीवाल्यांविरोधात ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असून सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. जर अधिकारी कारवाईची भाषा करतात पण त्याच्यात सातत्य कमी आणि दिखाऊपणा जास्त दिसून येतो त्यामुळे फेरीवाल्यांन मध्ये त्यांचे काही लागे बांधे आहेत का असा सवाल सामान्य नागरिक करताना दिसत आहेत.

दरम्यान, आठ दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फेरीवाल्या संदर्भात खळखत्‍याक शैलीत आंदोलनाचा इशारा दिला होता. मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि शहराध्यक्ष राहुल कामत यांनी पालिकेला स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्याची मागणी केली होती, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

यानंतर पालिकेच्या आजच्या कारवाईनंतर स्टेशन परिसरात शिस्त प्रस्थापित झाली असून नागरिकांनी याचे स्वागत केले आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त करत सांगितले की, स्टेशन परिसर 150 मीटरपर्यंत फेरीवाला मुक्त ठेवावा ही आमची प्रमुख मागणी असून, यापुढेही अशीच कारवाई होत राहावी अशी आमची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेनेचे रवींद्र धंगेकर देणार उद्या जैन बोर्डिंगला भेट

इतिहास, साहस आणि पर्यटनाचा संगम; रायगड किल्ल्यावर पर्यटकांचा उत्साह ओसंडला|VIDEO

Shocking : धक्कादायक! खेळताना छतावरून कोसळला; लोखंडी सळई थेट पोटातून आरपार, ५ वर्षीय मुलाची प्रकृती नाजूक

Brain Tumor: 'ही' लक्षणं साधी नसून असू शकतात ब्रेन ट्युमरचे संकेत

Amruta Khanvilkar Photos: ओठावर लाली अन् दिसायला भारी, अमृताचे फोटो पाहून तरूण घायाळ

SCROLL FOR NEXT