KDMC News Saam Digital
मुंबई/पुणे

KDMC News : कल्याणच्या टीएलआर कार्यालयात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

KDMC News Update : बोगस कागदपत्रे तयार करून बांधकाम परवानगी दिल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना अटक झालेली आहे. आता या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी कल्याण भूमीअभिलेख विभागात सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.

Sandeep Gawade

KDMC News

बोगस कागदपत्रे तयार करून बांधकाम परवानगी दिल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना अटक झालेली आहे. आता या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी कल्याण भूमीअभिलेख विभागात सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. नकाशा आणि त्यासाठी लागणारे स्टॅम्प आणि इतर साहित्याचा वापर या कार्यालयातून झाला आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांचे पथक कल्याण टीएलआर कार्यालयात दाखल झाले .पोलिसांना पाहताच कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचे धाब दाणाणले . वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक कडकल यांनी मुख्य अभिलेख अधिकारी नितीन साळुंखे यांना कार्यालयात सर्च करण्याकरीता वॉरंट त्यांच्या हाती दिले. साळुंखे यांना आधी काही समजले नाही. नंतर त्यांना सांगितले गेले की, कागद वाचून पहा. पोलिसांनी सांगितले की, कार्यालयातील काही साहित्याची चौकशीची करणार आहोत. यानंतर कार्यालयातील पहिला आणि दुसरा मजल्यावरील दस्तऐवजाची पडताळणी सुरू केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चार दिवसापूर्वी केडीएमसीची दोन अधिकारी राजेश बागूल आणि बाळू बहिराम यांना अटक करण्यात आली होती. केडीएमसी नगररचना विभागातील या दोन अधिकाऱ्यांनी २००९ आणि २०२१ साली दोन इमारतीच्या बांधकाम परवानगी प्रकरणी बोगस कागदपत्रे तयार केली होती. कल्याण टीएलआर कार्यालयातील दस्ताऐवज आणि शिक्क्यांचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणात टीएलआर कार्यालयातील कोण सामिल आहे. स्टॅम्प आणि कागदपत्रे या अधिकाऱ्यांना कशी मिळाली , केडीएमसीचे आणखीन किती अधिकारी सामिल आहेत. याचा तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates : उद्धव ठाकरेंनी बजावला मतदानाचा अधिकार

RBI Jobs: १०वी पास तरुणांना रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; ५७२ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Shashank Ketkar : "ज्या शाळेत मतदान केले त्या शाळेच्या बाहेर 'ही' अवस्था..."; शशांक केतकर चिडला, पाहा VIDEO

Voting Documents List: मतदानासाठी कोणती कागपत्रे आवश्यक? ही आहे संपूर्ण लीस्ट

Wight Loss Food: वजन कमी करण्यासाठी आजपासूनच टाळा हे ५ पदार्थ, १० दिवसात दिसायला लागेल फरक

SCROLL FOR NEXT