KDMC Commissioner Saam Digital
मुंबई/पुणे

KDMC Commissioner: केडीएमसीला मिळाल्या पहिल्या महिला आयुक्त, डॉ. इंदुराणी जाखड यांनी स्वीकारला पदभार

KDMC Commissioner: कल्याण डोंबिवली महापालिकेला लाभलेल्या पहिल्या महिला आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी आज आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

KDMC Commissioner

कल्याण डोंबिवली महापालिकेला लाभलेल्या पहिल्या महिला आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी आज आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी सर्वांच्या अपेक्षांना खरे उतरण्यासोबतच महिला बचत गटांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.

पुढे कसं नियोजन करावं, कामांची रूपरेषा कशी ठरवावी आहे, यासंदर्भात माहिती घेत आहे. पुढील काळात सगळ्यांना सोबत घेऊन चांगलं काम करून दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल नवनिर्वाचित आयुक्त चांगलं काम करतील विकासकामाना गती देतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती . याबाबत बोलताना आयुक्त जाखड यांनी सगळ्यांच्या अपेक्षांना खरे उतरण्याचा पूर्ण प्रयत्न करण्याबरोबर महिला बचत गटांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्या म्हणाल्या.

नुकताच केडीएमसीचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची बदली झाली होती. दांगडे यांच्याकडे राज्य सरकारच्या पेट्रोकेमिकल्स महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार देण्यात आला आहे. त्यांच्या जागी डॉ. इंदुराणी जाखड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेलच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत प्रथमच महिला आयुक्त लाभल्या आहेत. जाखड या राज्य सरकारच्या महिला विकास विभागात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे त्या विभागाचा अतिरिक्त कार्यभार तसाच ठेवून त्यांना कल्याण डोंबिवली महापालिकच्या आयुक्तपदाची जबाबदारी सरकारने सोपवली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान कालच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आयक्तांच्या बदलीवरून टीका केली होती. राज्य सरकार कल्याण- डोंबिवलीत नवनवीन आयुक्तांची निवड त्यांचा कार्यकाळ संपण्याआधीच करून टाकते. आमच्याकडे आयुक्त फेरीवाल्यांसारखे येतात आणि जातात, मात्र, आमच्या स्टेशन बाहेरचे फेरीवाले काही उठवले जात नाहीत. आता येणाऱ्या नव्या आयुक्त नक्कीच चांगले बदल करतील, अशी आशा करूया असं म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT