KDMC education department takes strict action against schools over forced purchase of uniforms and study materials. Saam Tv
मुंबई/पुणे

KDMC: शिक्षण साहित्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर होणार कारवाई ; केडीएमसी शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर

KDMC in Action Mode : केडीएमसी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना विशिष्ट विक्रेत्यांकडूनच गणवेश आणि अभ्यासाचे साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या शाळांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

Bharat Jadhav

  • शाळांकडून साहित्य खरेदीची सक्तीवर केडीएमसीची कारवाई

  • पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षण विभाग अॅक्शनमध्ये

  • गणवेश व साहित्य विशिष्ट दुकानातून घेण्यावर बंदी

संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी

राज्यभरात शिक्षण संस्थांकडून शाळेत साहित्याच्या नावावर लूट होत होती. याचे स्टिंग ऑपशन करून साम टीव्ही न्यूजने बातमी लावून धरली होती, त्याची दखल घेत शासनाच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढत शिक्षण संस्थेकडून विद्यार्थी आणि पालक याची शाळेत साहित्याच्या नावावर होणारी लूट थांबविण्यासाठी पाऊले उचलली आहेत. विद्यार्थ्यांची आणि पालकांची लूट करणाऱ्या अशा संस्थांवर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शिक्षण विभाग एक्शनमोड वर आले आहे. केडीएमसीच्या शिक्षण विभागाने कंबर कसली आहे.कल्याण-डोंबिवली खाजगी शाळांकडून विद्यार्थ्यांना गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारींनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाने महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार अशा प्रकारची सक्ती पूर्णतः बंद करण्याचे स्पष्ट निर्देश सर्व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना देण्यात आले आहेत.शासन निर्णयानुसार आणि शिक्षण संचालनालयाच्या परिपत्रकानुसार या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश पुन्हा एकदा देण्यात आले आहेत. कोणत्याही शाळेने विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पुस्तके किंवा इतर साहित्य विशिष्ट विक्रेत्याकडूनच खरेदी करण्यास भाग पाडू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच राज्य मंडळ, CBSE आणि ICSE शाळांनी अनुक्रमे NCERT/SCERT बालभारती किंवा संबंधित मंडळांनी मान्यता दिलेली पाठ्यपुस्तकेच वापरावीत. कोणत्याही खासगी प्रकाशनांची पुस्तके सक्तीने विकत घेण्यास विद्यार्थ्यांना भाग पाडल्यास त्यावर कारवाई होणार असल्याचा इशाराही कल्याण डोंबिवलीचे शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी भारत बोरणारे यांनी दिला आहे.

शिक्षण विभागाने सर्व शाळांना त्यांच्या व्यवस्थापन समितीत यासंदर्भात ठराव मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अशा सक्तीबाबत तक्रार असल्यास पालकांनी ssa.kdmc@gmail.com या ई-मेलवर कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित शाळांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले असून, पालक व विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sabja Seeds For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती?

Maharashtra News Live Update: आळंदी येथे पीएमपीएमएलच्या बसखाली चिरडून एकाचा मृत्यू

'पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका'; मोदीचं आवाहन, सराफा व्यापारी अडचणीत, VIDEO

राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात वाढ, पगार किती वाढणार?

'तुम तो ठहरे परदेसी' गाण्याचे गीतकार झहीर आलम यांचे निधन; ३ हजार रुपयांमध्ये लिहिलं होतं लोकप्रिय गाणं

SCROLL FOR NEXT