Ravindra Dhangekar Saam tv
मुंबई/पुणे

Ravindra Dhangekar Won: कसब्यात रवींद्र धंगेकरांनी बाजी मारल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आजचा विजय...'

Kasba Peth By Election Result: कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या विजयानंतर रवींद्र धंगेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : विधानसभेच्या कसबा पेठ पोटनिवडणुकीची आज, गुरुवारी मतमोजणी पार पडली. भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या कसबा पेठमधून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. कसबा पेठ मतदारसंघात तब्बल २८ वर्षांनी भाजपचा पराभव झाला आहे. या विजयानंतर रवींद्र धंगेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'आजचा विजय हा जनतेचा आणि महाविकास आघाडीचा आहे, अशी पहिली प्रतिक्रिया मविआचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाला आहे. तब्बल २८ वर्षानंतर कसब्यात भाजपचा उमेदवाराचा पराभव झाला आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.

विधानसभेच्या कसबा पेठ पोटनिवडणुकीची आज, गुरुवारी मतमोजणी सुरू असून, सुरुवातीचे कल येत आहेत. भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या कसबा पेठमधून काँग्रेसच्या (Congress) रवींद्र धंगेकरांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. या कसबा पेठमधून भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केल्यानंतर महाविकास आघाडची विजयी उमेदवार रवींद्र धंगेकरांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

रवींद्र धंगेकर म्हणाले, 'कसब्यात माझी पत्नी देखील जोरदार प्रचार करत होती. मी जेवढा फिरत होतो, तेवढ्याच तिही प्रचार करत होती. प्रत्येक घराघरात ती फिरत होती. अनेक मतदारांकडून आशीर्वाद मागत होती. तर आजचा विजय हा जनतेचा आणि महाविकास आघाडीचा आहे'.

रवींद्र धंगेकर अखेर कसबा पेठ मतदारसंघात विजयी

महाविकास आघाडीचे वियजी रवींद्र धंगेकर यांनी अधिकृत निकाल जाहीर होण्याआधीच विजयाचा गुलाल उधळला होता. मात्र, काही वेळाने निकाल जाहीर झाला. रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा ११०४० मतांच्या फरकाने पराभव केला. रवींद्र धंगेकर यांचा विजय हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akot News : मुसळधार पावसाने पूरजन्य स्थिती; अमीनापूर गावचा संपर्क तुटला, शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

SCROLL FOR NEXT