kapil patil. mamta banerjee, president election, sanjay raut, kalyan news
kapil patil. mamta banerjee, president election, sanjay raut, kalyan news saam tv
मुंबई/पुणे

विधान परिषद निवडणूकीत वडेट्टीवारांच्या 'त्या' वक्तव्याचा भाजपला फायदा हाेईल : कपिल पाटील

प्रदीप भणगे

कल्याण : ममतादीदींनी कितीही प्रयत्न करू दे भाजपला राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी एक टक्के मतांची आवश्यकता आहे. मोदींजीच्या (narendra modi) नेतृत्वाखाली भाजप कुठूनही कोणालाही कन्व्हेन्स करू शकते असा विश्वास केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील (kapil patil) यांनी व्यक्त केला. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत (president election) भाजपचा (bjp) उमेदवार १०० टक्के निवडून येणार असल्याचा दावा केला पाटील यांनी केला.

कल्याण डोंबिवलीतील निर्भय जर्नलिस्ट फौंडेशन तर्फे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा वार्तालाप ठेवण्यात आला होता. यावेळी पाटील यांनी विविध प्रश्नांवर आपले मत मांडले. तसेच केंद्र सरकारची बाजु घेत शिवसेनेवर टीका केली.

जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamta banerjee) यांनी देशातील २२ विरोधी पक्ष नेत्यांना पत्र पाठवून बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. त्यावर मंत्री पाटील यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार १०० टक्के निवड येणार असल्याचा दावा केला.

फडणवीसांची खेळी यशस्वी

संजय राऊत (sanjay raut) यांना निवडणूक स्ट्रॅटजीचा व निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे की नाही याबाबत विचार करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी नमूद केले. ते म्हणाले राज्यसभा निवडणुक निकलानंतर संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना आमच्या हातात इडी असती तर आम्हाला ही मतं मिळाली असती असे वक्तव्य केले. संजय राऊत यांना इडीमुळे मते मिळाली का , राज्यसभेच्या निवडणुकीत झालेला विजय हा देवेंद्र फडणवीस यांच्या स्ट्रॅटजीचा विजय आहे. राऊत यांना निवडणूक स्ट्रेटेजी आणि निवडणुक लढवण्याचा अनुभव आहे की नाही याचा विचार करण्याची गरज आहे. स्वतःची हार कुणाच्यातरी पाठीमागे लपवण्याचे काम करण्याची त्यांची पहिल्यापासूनची भूमिका आहे. काही झालं तरी केंद्राकडे बोट दाखवणार. यामध्ये ईडीचा प्रश्न आला कुठून ,त्यांच्या दोन आमदारांना हायकोर्टाने सुद्धा मतदानाचा हक्क नाकारला. हायकोर्ट सुद्धा इडीच्या सांगण्यावरून चालतं का ? असा सवाल पाटील यांनी केला.

वडेट्टीवार अपक्ष आमदारांवर दबाव टाकताहेत ?

राज्यसभा निवडणूक निकालानंतर महविकास आघाडीतील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अपक्ष आमदारांना निधी देताना विचार करू अस वक्तव्य केले आहे त्यावर केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील म्हणाले यांनी अशा प्रकारे वक्तव्य करणारे मंत्री आहे विधान परिषदेत भाजपचे पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी सहाय्य करतील असा याचा अर्थ आहे. राज्यसभा निवडणुकीत जी काही मतं भाजपच्या पारड्यात पडली ती महाविकास आघाडी सरकारवर नाराज असलेल्या आमदरांची होती. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर आणखी आमदार आमच्या बाजूने येत मतदान करतील ,अपक्ष आमदारावर दबाव आणण्याचं काम आघाडी सरकारचा सुरू आहे. देशात लोकशाही आहे राज्यात लोकशाही आहे की नाही याबाबत विचार करावा लागेल ,आघाडी सरकार मधील मंत्री अशा प्रकारे वक्तव्य करत असतील तर ते दुर्दैव आहे. अपक्ष आमदार या वक्तव्याचा विचार करतील आणि भाजपाला मतदान करतील असे पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha 2024 : मविआ आणि महायुतीच्या ४ प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा; ४८ तासात हिशेब देण्याची सूचना

Khalistani Terrorist: हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरणात 3 संशयितांना अटक; कॅनडा पोलिसांची कारवाई, भारतावर गंभीर आरोप

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

SCROLL FOR NEXT