Kalyan Railway Station Youth Electric Shock  Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan : कल्याण स्टेशनवर OHE खांबावर चढून तरुणाचा स्टंट, विजेचा धक्का लागून खाली पडला; रेल्वेसेवा खोळंबली, VIDEO व्हायरल

Kalyan Railway Station News : कल्याण स्थानकावर OHE खांबावर चढलेल्या तरुणाला विजेचा जोरदार धक्का बसून तो गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे काही काळ रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • कल्याण स्थानकावर तरुण OHE खांबावर चढला

  • विजेचा जोरदार धक्का बसून तो गंभीर जखमी

  • रेल्वे प्रशासनाने वीजपुरवठा तात्पुरता बंद केला

  • काही काळ रेल्वे सेवा विस्कळीत झाली

  • पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

Kalyan Railway Station Youth Electric Shock Incident कल्याण स्थानकावर आज एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर अचानक एक तरुण चढला. तो एका खांबावरून दुसऱ्या खांबावर पळ काढत होता त्याच दरम्यान तरुणाला विजेचा जोरदार धक्का बसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे काही काळ रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण अचानक OHE खांबावर चढल्याने स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने तत्काळ कल्याण डाउन लाईनचा वीजपुरवठा बंद केला. त्यामुळे काही काळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. या दरम्यान २ मेल/एक्सप्रेस गाड्या तसेच काही लोकल गाड्या उशिराने धावत होत्या.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि रेल्वे प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिस आणि बचाव पथकाला चकवा देत संबंधित तरुण एका खांबावरून दुसऱ्या खांबावर चढत असल्याने बचावकार्य अधिक कठीण झाले. अखेर, विजेचा तीव्र धक्का बसल्याने तो तरुण खाली कोसळला.

गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने रिक्षाच्या माध्यमातून जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. सदर घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकारामुळे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

Fact Check: PM किसान योजनेची रक्कम दुप्पट? 24 व्या हप्त्यात 4000 रुपये जमा होणार?

SCROLL FOR NEXT