Kalyan Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News: महिलेने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, कमरेला दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला; असं उघडकीस आलं प्रकरण

Kalyan Crime News: महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने कट रचून पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. कुणाला संशय येऊ नये म्हणून त्याचा मृतदेह परिसरातील एका विहिरीत दगड बांधून फेकून दिला.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Kalyan Crime News:

महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने कट रचून पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. कुणाला संशय येऊ नये म्हणून त्याचा मृतदेह परिसरातील एका विहिरीत दगड बांधून फेकून दिला. कल्याण जवळील आडीवली परिसरात ही घटना उघडकीस आली होती. चंद्रप्रकाश लोवंशी, असे या मयत इसमाचे नाव आहे.

मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास करत पत्नी रीता लोवंशी व तिचा प्रियकर सुमित विश्वकर्मा या दोघांनाही बेड्या ठोकल्यात. आपल्या प्रेमातला अडसर दूर करण्यासाठी रिता व सुमितने चार महिन्यांपासून प्लॅन आखला होता. कोणाला आपल्यावर संशय येऊ नये म्हणून रिताने काही दिवसांपूर्वीच चंद्रप्रकाश बेपत्ता असल्याचे तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. धक्कादायक म्हणजे या कटात सुमितचे दोन अल्पवयीन मित्र देखील सहभागी आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, २५ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कल्याण ग्रामीण परिसरातील अडीवली गावातील एका विहिरीत एका इसमाचा मृतदेह सापडला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली विहिरीत असलेला मृतदेहाला दगड बांधून विहिरी ढकलला असल्याचे निदर्शनास आले. या मृतदेहावर गळ्यावर वार देखील करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे मानपाडा पोलिसांना या व्यक्तीचे हत्या करून त्याला विहिरीत टाकून दिल्याचा संशय आला.  (Latest Marathi News)

याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू केलं. डीसीपी सचिन गुंजाळ एसीपी सुनील कुराडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी राम चोपडे, दत्तात्रय गुंड ,निशा चव्हाण, संपत फडोळ, प्रशांत आंधळे यांच्या पथकाने तपास सुरु केला. अवघ्या काही तासात मृतदेहाची ओळख पटली.

चंद्रप्रकाश लोवंशी हा डोंबिवली दावडी परिसरात राहणार होता. पोलिसांनी त्याची पत्नी रिता हिची चौकशी सुरू केली. तिने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना तीच्यावर संशय आला. पोलीस खाक्या दाखवतच तिने तिचा प्रियकर सुमित विश्वकर्माचे नाव सांगितले. पोलिसांनी तात्काळ सुमित विश्वकर्माला ताब्यात घेतले. या दोघांकडून माहिती घेतली असता पोलीस त्यांना देखील धक्का बसला सुमित विश्वकर्मा व रीताचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. चंद्रप्रकाश हा या प्रेमसंबंधाला अडचण ठरत होता. त्यामुळे या दोघांनी त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. गेले चार महिन्यापासून हे दोघे त्याच्या हत्येचा कट रचत होते. 20 जानेवारी रोजी त्यांनी संधी साधली.

सुमित विश्वकर्मा व त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांनी एका इको कारमध्ये चंद्रप्रकाश याला एका निर्जन स्थळी नेले. त्या ठिकाणी चंद्रप्रकाशचा गळा चिरून पाठीवर गुडघ्यावर वार करून क्रूरपणे हत्या केली. कुणाला संशय येऊ नये म्हणून त्याचा मृतदेह अडवली परिसरातील एका विहिरीत दगड बांधून फेकून दिला. याच दरम्यान रिता लोवंशी हिने पती चंद्रप्रकाश हा बेपत्ता असल्याचे तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. पोलिसांनी या हत्याकांडाचा अवघ्या 24 तासात पोलखोल करत सुमित विश्वकर्मावर रीता लोवंशी या दोघांनाही अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra Live News Update: पुण्यातील चारही धरणे जवळपास ९० टक्के भरली

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT