Kalyan Traffic News Saam Digital
मुंबई/पुणे

Kalyan Traffic News: वाहतूक पोलिसांची ट्राफिक वार्डनच्या माध्यमातून वसूली? मनसे आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पाठवला व्हिडीओ

Kalyan Traffic News: मुंब्रा बायपास कल्याण व शीळफाटा येथे अवजड वाहतून कोंडी होत असून वाहतूक कोंडीसाठी जबाबदार वाहन चालकांकडून पैसे घेऊन त्यांना प्रवेश दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

Sandeep Gawade

अभिजित देशमुख

Kalyan Traffic News

मुंब्रा बायपास कल्याण व शीळफाटा येथे अवजड वाहतून कोंडी होत असून वाहतूक कोंडीसाठी जबाबदार वाहन चालकांकडून पैसे घेऊन त्यांना प्रवेश दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यात ट्राफिक पोलिस आणि ट्राफिक वॉर्डन यांच्या संगनमताने वाहन चालकांना लुटण्याचा प्रकार सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान हा व्हिडिओ ठाणे, नवी मुंबई पोलिसांसह उपमुख्यमंत्र्यांना ट्वीट करत ही वसुली त्वरित थांबविण्याची मागणी राजू पाटील यांनी केली आहे.

मुंब्रा बायपास कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री आणि खासदार यांना लक्ष्य केले होते. आता पुन्हा राजू पाटील यांनी काही व्हिडिओ ट्वीट केले आहेत. या व्हिडिओत ट्राफिक वॉर्डन अवजड वाहन चालकांकडून पैसे घेत असल्याचा दावा करण्यात आला आहे. वाहतूक कोंडीसाठी जबाबदार अवजड वाहन चालकांकडून ठरलेल्या कालावधी आधी पैसे घेऊन त्यांना प्रवेश दिला जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या अवजड वाहनांमुळे कल्याण शीळ, मुंब्रा बायपासवर वाहतूक कोंडी होते. हे त्याचे मुख्य कारण आहे. मुंब्रा बायपास कल्याण व शीळ फाटा येथे ट्रॅफिक वार्डनसह वाहतूक पोलिसांच्या संगनमताने जे काही धंदे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन लोकांना अनेक तास रस्त्यातच अडकून पडावे लागत आहे. तसेच अवजड वाहनांच्या प्रवेशाची वेळ काटेकोरपणे पाळली जात नाही. हे सर्व धंदे बंद होतील अशी अशा करतो. आत्ता हा व्हिडिओ समोर आल्यावर पोलिसांकडून संबंधित ट्राफिक वॉर्डन पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली जाते हे पाहावे लागणार आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT