Kalyan ST Depot Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan ST Depot: कल्याण एसटी बस डेपो विठ्ठलवाडीला हलवणार, KDMC च्या निर्णयामागं नेमकं कारण काय?

Priya More

अभिजित देशमुख, कल्याण

Latest Update on Kalyan ST Depot Shifting:

कल्याणमध्ये (Kalyan) विकास कामाला गती आली आहे. कल्याण रेल्वे स्टेशन (Kalyan Railway Station) परिसरात विकास कामं वेगाने सुरु आहेत. अशामध्ये कल्याण स्टेशनजवळ असलेले एसटी बस डेपो विठ्ठलवाडीला हलवण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने (Kalyan-Dombivli Municipal Corporation) हा निर्णय घेतला आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पातील स्टेशन परिसरातील विकासाच्या कामाला गती देण्यासाठी कल्याणचा एसटी डेपो आणि कार्यशाळा विठ्ठलवाडी बस डेपोच्या जागेत स्थलांतरीत करण्यात येणार आहे. केडीएमसीने आज झालेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेतला आहे. पुढील आठ दिवसांत एसटी डेपोसाठी लागणारे सर्व सुविधा विठ्ठलवाडी येथे तयार करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे. त्याचबरोबर डेपोला लागून असलेली बॅडमिंटन कोर्टची इमारत पाडून ती जागा काही बसेस सोडण्यासाठी खुली केली जाणार आहे.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत स्टेशन परिसराच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. या कामाला गती मिळावी म्हणून पालिका आयुक्तांनी एसटी डेपोचे अधिकारी, वाहतूक पोलिसांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत स्टेशन परिसर विकासाच्या कामाला गती देण्यासाठी कल्याणचा एसटी डेपो आणि कार्यशाळा विठ्ठलवाडी बस डेपोच्या जागेत स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याचसोबत आज झालेल्या या बैठकीमध्ये कल्याण स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याबाबत देखील निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी शहरातील काही मार्गावर एकेरी वाहतूक सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आयुक्तांनी या बैठकीमध्ये दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT