सोशल मीडियावर मैत्री करुन प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
बॉयफ्रेंड व्हिडीओवरुन तरुणीला ब्लॅकमेल करु लागला.
ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली.
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही, प्रतिनिधी
Kalyan Crime News : कल्याणमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करुन एका तरुणीवर शारीरिक अत्याचार करण्यात आले. तरुणीच्या बॉयफ्रेंडने खासगी व्हिडीओवरुन तरुणीला धमकावले. यामुळे तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना कल्याण ग्रामीणमध्ये घडली आहे.
टिटवाळा पोलिसांनी तरुणीच्या बॉयफ्रेंडला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे. या तरुणाने आणखी काही तरुणींना अशाच प्रकारे फसविले असल्याचा आरोप केला जात आहे. व्हिडीओ कॉल करुन तरुणीने आत्महत्या केली असल्याने या प्रकरणाचा खुलासा झाला. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कल्याण नजीक असलेल्या टिटवाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीने तीन दिवसापूर्वी घराच्या टेरीसवर जाऊन गळफास घेतला. नातेवाईकांनी मुलींना नजीकच्या गोविली शासकीय रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिला मृत घाेषित केले. मुलीच्या घरच्यांनी मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करुन टाकला. या प्रकरणात शवविच्छेदन झाले नाही. डॉक्टरांनी ते करणे गरजेचे होते. मात्र ते करण्यात आले. मुलीच्या अंत्यविधीनंतर नातेवाईक घरी आले. मुलीचा मोबाईल हाती घेतला. तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला कारण तरुणी ही एका तरुणाच्या संपर्कात होती. तिने त्याला व्हिडिओ कॉल करुन आत्महत्या केली.
ऋतिक राेहणे या नावाच्या तरुणाने तिच्यासोबत इंस्टाग्रामवर मैत्री केली. कोणत्या कोणत्या बहाण्याने तरुणाने तिचे दागिने घेतले. एकतर दागिने देत नव्हता, तरुणी जेव्हा विचारायची दागिने दे, तेव्हा तो तरुणीला ब्लॅक मेल करीत होता. तिचा व्हिडिओ सोशल मिडियावर टाकणार असा तिला तो धमकावित होता. या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेत आत्महत्या केली.
हा प्रकार फक्त माझ्या मुलीसोबत केला नाही. तर अन्य मुलीसोबतही ही असाच प्रकार केला आहे. माझ्या मुलीसोबत जे घडले. ते दुसऱ्यांच्या मुलींसोबत घडू नये. आरोपीच्या विरोधात कठाेर कारवाई करा. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याने असा प्रकार अन्य किती मुलींसोबत केला आहे. याचा तपास आत्ता पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.