Kalyan-Shilphata Road Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan-Shilphata Road: कल्याण-शिळफाटा रोड ५ ते १० फेब्रुवारीदरम्यान बंद; 'या' पर्यायी मार्गाने करा प्रवास

Kalyan-Shilphata Road Closed For Heavy Vehicles: कल्याण - शिळफाटा मार्गावरील पलावा येथील रेल्वेवरील निळजे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम करण्यात येणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी रात्रीपासून ते १० फेब्रुवारी दरम्यान केले जाणार आहे.

Priya More

अभिजीत देशमुख, कल्याण

कल्याण आणि डोंबिवलीमधील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. कल्याण- शीळफाटा रोडवरील निळजे पुलाच्या पुनर्बांधणीसाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. येत्या ५ फेब्रुवारी म्हणजे उद्यापासून ते १० फेब्रुवारी या दरम्यान कल्याण - शीळ फाटा रोडवर जड- अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

वाहतुककोंडी टाळण्यासाठी हलक्या वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी कोणत्या पर्यायी मार्गाचा वापर करावा याबद्दल आपण जाणून घेणार आहोत....

कल्याण - शिळफाटा मार्गावरील पलावा येथील रेल्वेवरील निळजे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम ५ फेब्रुवारी रोजी रात्रीपासून ते १० फेब्रुवारी दरम्यान केले जाणार आहे. ५ फेब्रुवारीला मध्यरात्री या कामाला सुरुवात होणार असल्याने या काळात पलावा जंक्शनकडे जाणारी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.

या कालावधीत या मार्गावरून जाणाऱ्या हलक्या वाहनांना विरुद्ध दिशेकडील रस्त्याने जाता येईल. मात्र जड आणि अवजड वाहनांना कल्याण शीळ रोडवर या काळात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी खोणी तळोजा मार्गाचा तसेच डोंबिवली मोठागाव मानकोली पुलाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे. वाहनचालकांनी वाहतुकीच्या अधिसूचनेचे पालन करत सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

काय आहेत पर्यायी मार्ग?

- या काळात छोट्या वाहनांनी ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी डोंबिवली मोठागाव माणकोली पुलाचा वापर करावा.

- तसेच नवी मुंबईकडे जाण्यासाठी वाहनचालकांनी काटाई जंक्शनवरून पाईप लाईन मार्गे एमआयडीसी तळोजा मार्गाचा वापर करावा.

- तर हलक्या वाहनाना विरुद्ध दिशेची मार्गिका वापरता येणार आहे.

- हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या वाहनांनी कटाई नाका – कटाई गाव कमान मार्गे विरुद्ध वाहिनीवरून पुढे जाऊन पुढे पलावा जंक्शन येथे नियमित वाहिनीवरून प्रवास करावा.

- तर या काळात जड आणि अवजड वाहनांना कल्याण शिळ मार्गावर प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 264 हरकती,11 सप्टेंबर रोजी होणार सुनावणी

Taklyachi Bhaji Recipe : सणासुदीला खास बनवा टाकळ्याची भाजी, वाचा गावरान रेसिपी

Beed : बीड पुन्हा हादरलं! शिक्षिकेवर १६ वर्षे अत्याचार, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्टचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली मोठी माहिती|VIDEO

Horoscope: पाच राशींच्या जीवनात येणार चढ-उतार; भुतकाळामुळे वाद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT