Saptashrungi building collapses six people die little girl heartbreaking cry Saam Tv News
मुंबई/पुणे

Saptashrungi Building Accident : मम्मी, दीदी...; दीड वर्षीय चिमुकलीचा खिडकीतून हंबरडा, कल्याण दुर्घटनेतील अंगावर काटा आणणारा VIDEO

Kalyan Saptashrungi Building Accident : अंदाजे चार ते पाच वर्षांची चिमुकली खिडकीतू मम्मी...दिदी...असा जीवाचा आकांत करत ओरडत आहे. खालून काही लोकं तिला सांगत आहेत की, घाबरु नको...आम्ही आहोत.

Prashant Patil

ठाणे : कल्याणच्या चिकणीपाडा परिसरातील सप्तशृंगी इमारतीच्या दुर्घटनेनं अनेक कुटुबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या दुर्घटनेत निष्पाप ६ जणांचा मृत्यू झाला असून दोन वर्षांच्या चिमुकलीनेही आपला जीव गमावला आहे. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून एक दिवस अगोदरच ती चिमुकली तिच्या आईसह मामाच्या गावी आली होती. मात्र, तोच दिवस काळ बनून जीवावर उठला. नमस्वी शेलार असं या मृत मुलीचं नाव आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखालून या चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर येथील उपस्थितांचे डोळे पाणावले होते. तर, आपल्या चिमुकलीचा मृतदेह हाती घेऊन आईनं हंबरडा फोडला, हे काळीज पिळवटून टाकणारं दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. त्याचदरम्यान, एक चिमुकलीचा काळीज चिरणारा व्हिडिओ आता समोर आला आहे.

अंदाजे चार ते पाच वर्षांची चिमुकली खिडकीतू मम्मी...दिदी...असा जीवाचा आकांत करत ओरडत आहे. खालून काही लोकं तिला सांगत आहेत की, घाबरु नको...आम्ही आहोत. हा व्हिडिओ पाहून अक्षरश: उपस्थितांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. दरम्यान, या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका चिमुकलीचा समावेश आहे.

दरम्यान, सप्तशृंगी इमारतीच्या तळमजल्यावर जयश्री गुजर घरात किचनमध्ये काम करत होत्या. याच दरम्यान दुपारच्या सुमारास चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. मोठ्ठा आवाज झाल्याने जयश्री बाहेर आल्या तर भला मोठा स्लॅब कोसळल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर, काही क्षणातच सगळीकडे मोठी धूळ पसरली. या धक्क्यातून सावरतेच तोच आपली आजी, आत्या, ४ वर्षांचा भाचा, दोन वर्षांची भाची ढीगाऱ्याखाली असल्याचं जयश्रीच्या लक्षात आलं. आजूबाजूच्या नागरिकांनी लगेच धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरू केलं. याचदरम्यान अग्निशमन विभागानं घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. या दुर्घटनेत जयश्री बचावली तरी तिची आजी सुशीला शेलार, दीड वर्षाची भाची नमस्वी शेलार यांचा मृत्यू झाला. तर, तिची आत्या अरुणा विरणारायन आणि भाचा श्रविल शेलार जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लेक आईला भेटण्यासाठी नाशिकच्या सिन्नरवरून कल्याणला घटनेच्या एक दिवस अगोदर आली होती. दुसऱ्या दिवशी दुपारी जेवणाची तयारी सुरू होती, नात जयश्री किचनमध्ये जेवणाचं नियोजन करत होती, तर हॉलमध्ये माय-लेकी गप्पा मारत होत्या. चिमुकलं लहान मुलं दुपारच्या झोपेत होतं, त्यातच अचानक मोठा आवाज झाला आणि डोळ्यासमोर होत्याच नव्हतं झालं. या दुर्घटनेत झोपेत असलेली लहान मुलगी ढिगाऱ्यात अडकून पडली, बचाव कार्यादरम्यान दोघांना वाचवण्यात यश आलं पण दोन वर्षांच्या चिमुकलीचे झोपेत असतानाच निधन झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT