Kalyan Rukminibai Hospital 
मुंबई/पुणे

Kalyan Women Death: ४ तास ताटकळत ठेवलं, ॲम्बुलन्स मिळाल्यावर १०० कारणं दिली; डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा करुण अंत

Kalyan Rukminibai Hospital : महिला रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे महिलेचा मृत्यू झालाय. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.

Bharat Jadhav

अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी

कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी येथील राहणाऱ्या एका महिलेला रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमावावा लागलाय. प्रकृती खराब झाल्यानंतर ही महिला कल्याण महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. परंतु रुग्णालयात डॉक्टरच नसल्यानं महिलेच्या नातेवाईकांना रुग्णाला कळवा येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. पण रुग्ण महिलेला कळवा येथील रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईकांना रुग्णवाहिका मिळालीच नाही. त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला. सविता गोविंद विराजदार (४३) असं मृत झालेल्या महिलेचं नाव आहे.

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला असा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलाय. रुग्ण महिलेला कळवा येथील रुग्णलयात येण्यासाठी नातेवाईकांनी पालिका आणि खासगी अॅम्बुलन्सचा तपास केला. परंतु त्यांना अॅम्बुलन्स मिळाली नाही. हतबल झालेल्या विराजदार कुटुंबियांना चार तासानंतर एक अॅम्बुलन्स मिळाली. परंतु अॅम्बुलन्स आपण कळवा रुग्णालयात नेणार नाही, जी ॲम्बुलन्स मिळाली ती एका रुग्णाला त्या ठिकाणी घेऊन जाणार नाही, असं कारण दिलं. त्यामुळे हतबल झालेल्या मृत महिलेच्या नातेवाईकांनी सविता यांना त्याच रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेतला.

रुग्णालयात उपचार होतील, या आशेने विशेष म्हणजे ५ तास होऊनही रुग्णालयात डॉक्टर आले नाहीत. त्यामुळे उपचाराअभावी महिलेचा मृत्यू झाला. याबाबत कल्याण रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिलीय. ॲम्बुलन्ससाठी दोन्ही मुलांचा निर्णय होत नव्हता. त्यात वेळ निघून गेलं. पण नातेवाईक जे आरोप करत आहेत, त्याबाबत चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT