Kalyan News: १७ व्या मजल्यावरून उडी मारून महिलेने संपवलं जीवन, कल्याणमध्ये खळबळ

Woman Jumps from 17th Floor In Kalyan: कल्याणमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने १७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना कल्याणमधील योगिधाम परिसरामध्ये घडली आहे.
Kalyan News: १७ व्या मजल्यावरून उडी मारून महिलेने संपवलं जीवन, कल्याणमध्ये खळबळ
Woman Jumps from 17th Floor In KalyanSaam Tv
Published On

अभिजित देशमुख, कल्याण

इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली. कल्याणच्या योगिधाम परिसरात ही घटना घडली. अज्ञात महिलेने इमारतीमध्ये प्रवेश केला. लिफ्टमधून ती १७ व्या मजल्यावर गेली त्यानंतर तिने उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे योगिधाम परिसरात खळबळ उडाली आहे. ही महिला कोण आहे याचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण योगिधाम परिसरात एका इमरतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास एका ३५ वर्षीय महिलेने आत्महत्या केली. ही महिला या इमारतीमध्ये राहत नसून ती बाहेरून इमारतीमध्ये आल्याचे माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. ही महिला लिफ्टने १७ व्या मजल्यावर जात असताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

Kalyan News: १७ व्या मजल्यावरून उडी मारून महिलेने संपवलं जीवन, कल्याणमध्ये खळबळ
Kalyan News: रस्त्याच्या मधोमध खोदकाम, ठेकेदाराचा निष्काळजीपणा; दुचाकीस्वार थेट खड्ड्यात; पाहा VIDEO

या घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून ही महिला कुठे राहत होती? ती या इमारतीमध्ये का आली? या महिलेने आत्महत्या का केली? याचा तपास पोलिस करत आहेत.

Kalyan News: १७ व्या मजल्यावरून उडी मारून महिलेने संपवलं जीवन, कल्याणमध्ये खळबळ
Kalyan News: बदनाम गल्लीची लेडी डॉन गजाआड, लेडी डॉनमुळे तरुणाई ड्रग्सच्या विळख्यात, कल्याण पोलिसांची कारवाई|VIDEO

दरम्यान, लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्याप्रकरणी डोंबिवलीमध्ये एका ४७ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. सुभाष भोईर असं या आरोपीचे नाव आहे. त्याने ३७ वर्षीय लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. ही घटना २२ एप्रिल रोजी डोंबिवलीमध्ये घडली होती. आरोपीच्या पत्नीचे २० वर्षांपूर्वी निधन झाले होते. गेल्या ३ वर्षांपासून त्याचे हत्या केलेल्या महिलेशी प्रेमसंबंध होते. मृत महिला तिच्या पत्नीपासून वेगळी झाली होती. आरोपी आणि मृत महिला दोघेही एकत्र राहत होते. किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर रागाच्या भरात आरोपीने महिलेची गळा दाबून हत्या केली होती.

Kalyan News: १७ व्या मजल्यावरून उडी मारून महिलेने संपवलं जीवन, कल्याणमध्ये खळबळ
Kalyan MNS : केडीएमसीने नसलेले डिव्हायडर रंगवत काढले लाखोंचे बिल; मनसेचा आरोप, रंगाच्या बादल्या ब्रश घेऊन आंदोलन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com