BJP: भाजपला मोठा झटका! राष्ट्रीय प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

BJP Leader Resign: भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
BJP: भाजपला मोठा झटका! राष्ट्रीय प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ
BJP Leader Resign:Saam Tv
Published On
  • भाजपला मोठा धक्का बसला

  • शहजाद पूनावाला यांचा तडकाफडकी राजीनामा

  • भाजप राष्ट्रीय प्रवक्त्याचा दिला राजीनामा

  • राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भारतीय जनता पक्षाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील प्रोफाइलमधल्या बायोममध्ये बदल केला. त्यामुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकल्य्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. पण शहजाद पूनावाला यांच्याकडून किंवा पक्षाकडून राजीनाम्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. तर त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याची चर्चा देखील होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे प्रवक्ते असलेल्या शहजाद पूनावाला यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे सादर केला आहे. त्यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शहजाद पूनावाला लवकरच त्यांच्या राजीनाम्याबाबत अधिकृत निवेदन जारी करतील.

BJP: भाजपला मोठा झटका! राष्ट्रीय प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ
BJP Maharashtra : भाजपाच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल, दिग्गज महिला नेत्याला जातिवाचक शिवीगाळ, राज्यात खळबळ

शहजाद पूनावाला हे भाजपचे एक खंदे प्रवक्ते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक राहिले आहेत. शहजाद पूनावाला यांच्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरील बायोमध्ये भाजपचा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे. एक्सवरील बायोमध्ये, त्यांनी स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजीवन समर्थक म्हणून संबोधले आहे. दरम्यान, शहजाद पूनावाला यांच्या इन्स्टाग्रामवरील बायोमध्ये अजूनही त्यांचा उल्लेख भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणूनच आहे. त्यामुळे शहजाद पुनावाला यांनी खरंच भाजला सोडचिठ्ठी दिली की नाही याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.

BJP: भाजपला मोठा झटका! राष्ट्रीय प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ
Karnataka Vidhan Sabha Election Results: कर्नाटक निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला नाकारलं; बेळगावात कोणी मारली बाजी?

शहजाद पूनावाला हे भाजपच्या सर्वात स्पष्टवक्त्या प्रवक्त्यांपैकी एक आहेत. ते व्यवसायाने वकील आणि नागरी हक्क कार्यकर्ते आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली राहुल गांधींना अध्यक्षपदी बसवण्यासाठी पक्षाच्या अंतर्गत निवडणूक प्रक्रियेत 'गैरप्रकार' करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी पक्षाला रामराम ठोकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com