kalyan rto and ambernath traffic cops seized 21 illegal auto rickshaw Saam Digital
मुंबई/पुणे

Ambernath : अनधिकृत रिक्षा चालकांना दणका, अंबरनाथला 21 वाहनं जप्त; 1 लाख 72 हजारांचा दंड वसूल

अजय दुधाणे

Ambernath News :

अंबरनाथ येथे वाहतूक विभाग आणि कल्याण परिवहन विभागाने धडक कारवाई करीत तब्बल एक लाख 72 हजार रुपयांचा दंड वाहन चालकांकडून वसुल केला आहे. यामध्ये 21 रिक्षा जप्त केल्याची माहिती अंबरनाथ वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी साम टीव्हीला दिली. (Maharashtra News)

रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत रिक्षा चालकांमुळे परवानाधारक रिक्षाचालकांना त्रास होत असल्याने वाहतूक विभागाने अनधिकृत रिक्षा आणि रिक्षा चालकांवर कायमस्वरूपी कारवाई करावी या मागणीसाठी जोशीकाका रिक्षा चालक-मालक संघटनेचे शहर अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी रिक्षा बंदचा इशारा दिला होता.

या पार्श्वभूमीवर अंबरनाथ वाहतूक विभागाने नुकतीच धडक कारवाई केली. अंबरनाथ वाहतूक विभाग आणि कल्याण परिवहन विभागाने संयुक्त कारवाई दरम्यान 21 रिक्षा जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे अंबरनाथ शहरातील अनधिकृत रिक्षा चालकांचे धाबे चांगलेच दणाणलेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर, एकमताने पुण्यात निवड

VIDEO : तिरूपती बालाजीच्या प्रसादात किडे? धक्कादायक माहिती आली समोर

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

Nanded News : सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्याने १० जणांना विषबाधा, १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT