Rail Roko At Lonavala : मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस लोणावळ्यात 20 मिनिट रोखली; संतप्त नागरिक उतरले रुळावर

नागरिक रेल्वे रुळावर उतरल्याने जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
lonavala citizens rail roko andolan deccan queen express stand still for 20 min
lonavala citizens rail roko andolan deccan queen express stand still for 20 minsaam tv
Published On

- अक्षय बडवे / दिलीप कांबळे

Pune News :

पुणे लोणावळा लोकल फेऱ्या 11 ते 3 या वेळेत सुरू कराव्यात तसेच एक्सप्रेस गाड्यांचा थांबा लोणावळ्यात करावा या मागणीसाठी आज (शुक्रवार) स्थानिकांनी लोणावळा येथे रेल रोको आंदोलन (rail roko andolan) करण्यात आले. पुण्याकडून मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन एक्सप्रेस (deccan queen express) स्थानिकांनी तब्बल 20 मिनिटे रोखून धरली हाेती. (Maharashtra News)

या आंदाेलना प्रसंगी रेल्वे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात हाेता. रेल्वे पोलिसांकडून स्थानिकांना रोखण्यात आले. मात्र तरी देखील स्थानिकांनी रुळावर उतरून डेक्कन क्वीन एक्सप्रेस रोखली. दरम्यान मोठ्या संख्येने नागरिक रेल्वे रुळावर उतरल्याने जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

lonavala citizens rail roko andolan deccan queen express stand still for 20 min
Mumbai Trans Harbour Link: 'अटल सेतू' वर स्थानिकांना टाेल माफी द्या : काॅंग्रेसची मागणी

लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि वंदे भारत रेल्वे लोणावळा येथे थांबवण्यात यावी तसेच पुणे लोणावळा लोकल फेऱ्या 11 ते 3 यावेळेत हव्यात अशी प्रमुख मागणी असल्याचे स्थानिकांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. दरम्यान आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी समजूत काढल्यानंतर डेक्कन क्वीन एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

lonavala citizens rail roko andolan deccan queen express stand still for 20 min
Train Cancelled List : रेल्वेकडून 6 फेब्रुवारीपर्यंत 24 गाड्या रद्द; जाणून घ्या एक्सप्रेसची यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com