Kalyan Meat Sale Ban Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Protest: मासविक्री बंदीविरोधात खाटिक समाज आक्रमक, KDMC समोर कोंबड्या घेऊन आंदोलन; पाहा VIDEO

Kalyan Meat Sale Ban: कल्याणमध्ये मास विक्री बंदीविरोधात खाटीक समाज आक्रमक झाला आहे. केडीएमसीच्या समोर खाटीक समाजाने हातामध्ये कोंबड्या घेऊन आंदोलन केले. यावेळी आयुक्तांविरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या.

Priya More

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

गेल्या काही दिवसांपासून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चिकन-मटण विक्रीचा मुद्दा गाजत आहे. १५ ऑगस्ट रोजी मांसविक्री बंदीच्या केडीएमसीच्या निर्णयाविरोधात आज खाटिक समाज आणि काँग्रेस पक्षाकडून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. खाटीक समाज आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हातामध्ये कोंबड्या घेऊन केडीएमसीच्या या निर्णयाचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

१५ ऑगस्ट रोजी मांसविक्री बंदीच्या केडीएमसीने घेतलेल्या निर्णयाची प्रसिद्धी माध्यमांद्वारे माहिती मिळाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सामाजिक आणि राजकीय वर्तुळात उमटत आहेत. अगदी दिल्लीतील केंद्रीय नेत्यांपासून ते मुंबईच्या मंत्रिमंडळापर्यंत नेत्यांकडून या निर्णयावर सकारात्मक आणि विरोधातमक प्रतिक्रिया येत आहेत. तसेच स्थानिक पातळीवरही हिंदू खाटीक समाजाने या निर्णयाला तीव्र विरोध केला.

आजच्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केडीएमसी मुख्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा खाटीक समाजाने दिला होता. या तीव्र विरोधानंतरही केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहत कोणत्याही परिस्थितीत हा निर्णय बदलणार नसल्याचे दोनच दिवसांपूर्वी स्पष्ट केले.

या सर्व पार्श्वभूमीवर हिंदू खाटीक समाजाने आणि काँग्रेससह विविध राजकीय पक्षांनी आज आंदोलनाचा इशारा दिला होता. परिणामी झेंडावंदन झाल्यानंतर आज सकाळपासूनच केडीएमसी मुख्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तर खबरबदारीचा उपाय म्हणून शंकरराव चौकाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारा आणि तिकडून या दिशेने येणारे दोन्ही मुख्य रस्ते पोलिसांनी बॅरिकेट लावून बंद केले होते.

दरम्यान सुरुवातीला खाटीक समाजाच्या सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी अचानक केडीएमसी मुख्यालयाबाहेर धडक देत निदर्शने केली. हातामध्ये कोंबड्या घेत त्यांनी केडीएमसीच्या या निर्णयाचा विरोध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malavya Rajyog: 12 महिन्यांनी बनणार मालव्य राजयोग; 'या' ३ राशींवर शुक्राची राहणार कृपा, धनलाभ होणार

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

SCROLL FOR NEXT