Kalyan Crime  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime : पुण्यानंतर कल्याणमध्ये मुलाने कार धडकवली; सोशल मीडियावरील चर्चेनंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये

Kalyan Crime News : पुण्यानंतर कल्याणमध्ये मुलाने कार धडकवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर कल्याण पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : पुण्यातील कल्याणीनगरमधील अपघाानंतर कल्याणमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. कल्याणमध्ये एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने अल्पवयीन मुलाने कार धडकवल्याचा प्रकार केला आहे. कल्याणमधील अटाळी जवळ ही घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

कल्याणमध्ये नेमकं काय घडलं?

कल्याणमधील अटाळी जवळ एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या अल्वपयीन मुलाने पुण्यासारखा कारनामा केला आहे. कल्याणमधील या अल्पवयीन मुलाने एका कारला जोरदार धडक दिली. कारला धडक दिल्यानंतर अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या त्याच्या साथीदाराने कारचालकाला मारहाण केली. शुक्रवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

अल्पवयीन मुलाने कारचालकाला माराहण केल्यानंतरही हे प्रकरण पोलिसांत पोहोचलं नसल्याचे उघड झालं आहे. मात्र, या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. या प्रकरणाची पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांनीही या प्रकरणाची तक्रार नोंदवली नसल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

परंतु या प्रकरणाची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्यानंतर कारचालक अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांविरोधात खडकपाडा पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.

नेमकं काय घडलं?

राजाराम चौधरी असे या अल्पवयीन मुलाच्या वडिलांचे नाव आहे. धडक दिल्यानंतर अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या साथीदाराने कारचालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर अल्पवयीन मुलाने त्याच्या काही मित्रांना बोलावून कार चालकाला मारहाण करत कारची तोडफोड केली. या घटनेनंतर कारचालकाने पोलिसांना मदतीसाठी फोन केला. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे वडील आणि अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT