Kalyan bar Major Crackdown Saam
मुंबई/पुणे

कल्याणच्या 'छमछम'वर छापा; बारबालांचे अश्लील नृत्य अन्... २८ जणांवर गुन्हा दाखल

Major Crackdown in Kalyan: कल्याण पश्चिमच्या लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांचा छापा.पोलिसांनी १५ बारबाला सहित एकूण २८ जणांवर गुन्हा दाखल केला. परिसरात खळबळ.

Bhagyashree Kamble

  • कल्याण ताल बारवर मध्यरात्री पोलिसांचा छापा

  • १५ बारबाला सहित २८ जणांवर गुन्हा दाखल

  • कल्याण पश्चिमेत खळबळ

कल्याणमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच कल्याण पश्चिममधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. लेडीज सर्व्हिस बारवर सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने महात्मा फुले चौक परिसरातील ताल बारवर मध्यरात्री धडक कारवाई केली.

कल्याण पश्चिम येथील लेडीज सर्व्हिस बारवर गैरप्रकार सुरू असल्याचं कळताच पोलिसांनी छापा टाकला. बारमध्ये आक्षेपार्ह नृत्य, तोडक्या कपड्यातील बारबाला, कानठळ्या बसवणारा डीजे आणि पहाटेपर्यंत सुरू असलेला व्यवसाय अशा अनेक नियमभंगाच्या तक्रारींवरून हा छापा टाकण्यात आला.

तपासात नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी १५ बारबाला सहित एकूण २८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी बारचे मालक, चालक, मॅनेजरसह एकूण ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अचानक धाड पडताच बारमधील वातावरण एकदम शांत झाले असून, मद्यपींची झिंगही उतरली. या कारवाईमुळे कल्याण-डोंबिवली परिसरात पुन्हा एकदा डान्सबारवरील पोलिस अॅक्शनची मोठी चर्चा रंगली आहे.

पोलिसांकडून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर पुढील काळातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुका लागताच भाजपला धक्का; दिग्गजांचा अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Maharashtra Live News Update: सोलापूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी भाजपाची जोरदार तयारी

वादळाचा तडाखा, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती कोसळली, पाहा व्हिडिओ

Gold Rate Today: खुशखबर! सोन्याचे दर घसरले; १० तोळ्यामागे १५,००० रुपयांची घसरण; वाचा २२ आणि २४ कॅरेटचे भाव

Winter Health : सावधान! थंडीत रात्री झोपताना तोंडापर्यंत ब्लँकेट घेताय? 'ही' चूक पडेल महागात

SCROLL FOR NEXT