KDMC Hospital News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News: गरोदर नसतानाही प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह, KDMC रुग्णालयात धक्कादायक प्रकार; पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली

KDMC Hospital News: कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीची प्रेग्नेंसी टेसस्ट पॉझिटिव्ह आली.

Priya More
  • कल्याण केडीएमसी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

  • अल्पवयीन मुलीची प्रेग्नेंसी टेस्ट आली पॉझिटिव्ह

  • बाहेरून टेस्ट केली असता आली निगेटीव्ह

  • केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात हा प्रकार घडला

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला कथितरित्या गर्भवती असल्याचा अहवाल देण्यात आल्याने खळबळ उडाली. हिमोग्लोबिन कमी असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या या मुलीची गर्भधारणेची चाचणी तीन वेळा करण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. विशेष म्हणजे रुग्णालयातील तपासणी तसेच संबंधित निदान केंद्रातील अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. तर कुटुंबीयांनी बाहेरून केलेल्या प्रेग्नन्सी टेस्टमध्ये अहवाल निगेटिव्ह आल्याचा दावा केला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलीला हिमोग्लोबिन कमी असल्याने शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. उपचारादरम्यान तिची गर्भधारणेची चाचणी करण्यात आली. पहिल्या अहवालानंतर पुन्हा तपासणी करण्यात आली आणि एकूण तीन वेळा चाचणी झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तसेच सोनोग्राफीच्या अहवालाबाबतही पॉझिटिव्ह निष्कर्ष सांगण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या अहवालामुळे कुटुंबीयांना धक्का बसला. अहवालावर संशय आल्याने तरुणीच्या वडिलांनी बाहेरुन टेस्ट केली. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी संबंधित निदान केंद्राशी संपर्क साधून या अहवालांबाबत स्पष्टीकरण मागितले.

या कथित प्रकारामुळे अल्पवयीन मुलगी जवळपास २४ तास मानसिक तणावाखाली राहिल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. वैद्यकीय अहवालांमध्ये झालेल्या या कथित तफावतीमुळे मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली. भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी या प्रकरणाचा खुलासा करत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. वैद्यकीय तपासणीचे अहवाल, प्रयोगशाळेतील चाचण्या आणि सोनोग्राफीचा अहवाल यांची पडताळणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

तपासणी अहवालांमध्ये तफावत कशी?

एकाच रुग्णाच्या तपासणीमध्ये वेगवेगळे निष्कर्ष कसे आले?, चाचणी प्रक्रियेत काही त्रुटी झाली का?, प्रयोगशाळेच्या अहवालात चूक झाली का किंवा अहवाल समजून घेण्यात काही गैरसमज झाला का?, याची वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी होणे आवश्यक आहे. या प्रकरणामुळे केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील तपासणी यंत्रणा आणि निदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित रुग्णालय प्रशासन तसेच निदान केंद्राकडून या प्रकरणाबाबत अधिकृत स्पष्टीकरण काय दिले जाते, याकडे आता लक्ष लागले आहे. या प्रकरणाची चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त; खंडव्याचा प्रवासी ताब्यात

आता सुटका नाहीच! दूध, पनीरसह अन्न भेसळखोरांवर होणार 'मकोका' अंतर्गत कारवाई

तूप खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते? जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

Pune Mumbai Expressway Traffic Update: पुणे-मुंबई प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; बुधवारी तीन तास कनेक्टिंग लिंक बंद

Shocking: लाईट बिल कसं भरू? सफाई कर्मचारी महिलेला आलं एका महिन्याचं 2 लाख 18 हजाराचं वीजबिल

SCROLL FOR NEXT