

कल्याणमध्ये पोलिसावर जीवघेणा हल्ला
गौरीपाडा येथे घडली घटना
मद्यधुंद तरुणाने लाकडी काठीने केली मारहाण
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होत आहे
कल्याणमध्ये पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. एका मद्यधुंद तरुणाने पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. लाकडी काठीने त्याने पोलिसावर हल्ला केला. या हल्लायत पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक मद्यधुंद तरुण गौरीपाडा परिसरात नागरिकांच्या घराबाहेर उभा राहून आरडाओरडा करत होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. तक्रारीनंतर खडकपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी गणेश चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. खडकपाडा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी गणेश चव्हाण हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला झाला.
आरोपी राहुल तायडे या गोंधळ घालणाऱ्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाला पोलिस कर्मचारी गणेश चव्हाण यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने पोलिस कर्मचारी गणेश यांच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. त्याने गणेश यांच्यावर काठीने हल्ला करत त्यांना मारहाण केली. या प्रकारात खडकपाडा पोलिसांनी राहुल तायडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेच्या सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.