Kalyan news  Saam tv
मुंबई/पुणे

तू मला हात का लावला? कल्याणमध्ये KDMC च्या गेटवर तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

kalyan news : कल्याणमध्ये एका तरुणाला अमानुष मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Saam Tv

कल्याणमध्ये तरुणाला गुंडांकडून मारहाण

क्षुल्लक कारणावरून तरुणाला बेदम मारहाण

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणमध्ये तरुणांची गुंडगिरी पाहायला मिळत आहे. तू हात का लावला? या क्षुल्लक कारणावरून गुंडांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. तरुणाला मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर कल्याणमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

रस्त्यात चालत असताना एका तरुणाचा एका तरुणीला हात लागला. तू मला हात का लावला ? यावरुन तरुण आणि तरुणीचा वाद झाला. याच दरम्यान तरुणासोबत असलेल्या तरुण देखील त्याठिकाणी होता. तरुणीने हा सगळा प्रकार कार्यालयातील सहकारी तरुणांना सांगितले. तरुणी घरी निघून गेली. ज्याच्यावर तरुणीने आरोप केला होता. तो तरुण देखील निघून गेला. मात्र तरुणीच्या सहकार्यांनी ज्याचा काही दोष नव्हता. त्या तरुणाला गाठून जवळपास दोन तास त्याला बेदम मारहाण केली.

यावेळी काही नागरीकांनी मध्यस्थी करीत जमखी तरुणाला मारहाण करणाऱ्या तरुणांच्या तावडीतून सोडवले. सध्या बाजारपेठ पोलिस याचा तपास करीत आहे. मारहाणीचा व्हीडीआे सोशल मीडीयावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे ही सगळी घटना केडीएमसी मुख्यालयाच्या समोरच घडला. यावेळी केडीएमसीचे सुरक्षा रक्षक हा तमाशा उघड्या डोळ्यांनी पाहत होते.

केडीएमसी मुख्यालयासमोर पायी चालत जात असताना एका तरुणाने कुणाल साळवे नावाच्या तरुणाकडे खाण्यासाठी तंबाखू मागितली. कुणाल याने त्याच्या मित्राला तंबाखू देखील दिली. याचेळी कुणालच्या मित्राचा हात रस्त्याने जात असलेल्या तरुणीला लागला. तरुणीने आरोप केला की, माझी छेड का काढली. यावरुन तरुण आणि तरुणीचा वाद झाला.या वेळी तरुणीने तिच्या सहकाऱ्यांना बोलावून घेतले. नागरिक ही त्याठिकाणी जमा झाले.

तरुणीने त्यावेळी सांगितले की, माझी कोणाविरोधात तक्रार नाही. ती निघून गेली. तरुणीचे सहकारी ऐकण्यास तयार नव्हते. ज्या तरुणावर छेडछाडीचा आरोप होता. तो देखील तिथून निघून गेला. तरुणीच्या सहकाऱ्यांनी साळवे याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी बेदम मारहाण सुरू असताना नागरिकांनी मध्यस्थी केली. यावेळी काही पत्रकार देखील उपस्थित होते. बाजारपेठ पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले.

तरुणी पोलिस ठाण्यात पोहचली. तिने सर्व प्रकार कथित केला. पोलिस पुढील तपास करीत आहे. एका तरुणीसोबत छेड काढली गेली असेल तर छेड काढणार्‍यांच्या विरोधात कारवाई झाली. मात्र ज्याचा कोणताही दोष नाही. त्याला मारहाण करण्याचा अधिकार तरुणीच्या सहकारऱ्यांनी कोणी दिला ? ज्या प्रकारे मारहाण करण्यात आली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे.

या प्रकरणात बाजारपेठ पोलीस कारवाई करीत आहे. या दरम्यान व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या पत्रकारांना धमकी दिली गेली. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहे. यामध्ये जे दोषी असतील त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT