khadakpada police arrested irani women Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Police Arrested Irani Women: कल्याणमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या 'इराणी ड्रग लेडी'ला अटक

Kalyan Latest news: कल्याणच्या आंबिवली, मोहने परिसरात ही महिला एम डी ड्रग्जसह चरस विक्री करते.

Priya More

अभिजीत देशमुख, कल्याण

Kalyan News: कल्याणमध्ये (Kalyan) अंमली पदार्थाची (Narcotics) विक्री मोठ्याप्रमाणात वाढली आहे. याविरोधात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कल्याणच्या आंबिवली येथील इराणी वस्तीमधून याप्रकरणी इराणी ड्रग लेडीला पोलिसांनी अटक केली आहे. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी (Khadakpada Police) ही कारवाई केली आहे. सबा सैय्यद असे या महीलेचे नाव असून ती कल्याणच्या आंबिवली, मोहने परिसरात एम डी ड्रग्जसह चरस विक्री करते.

कल्याणजवळ आंबिवली परिसरातील इराणी वस्तीत एक महिला एम डी ड्रग्जसह चरस विक्री करत असल्याची माहिती कल्याण खडकपाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंगळवारी कल्याण खडकपाडा पोलिसांच्या पथकाने रात्रीच्या सुमारास आंबिवली परिसरात इराणी वस्तीत छापा टाकून एका महिलेला ताब्यात घेतले. या महिलेचे चौकशी केली असता तिच्याकडे एमडी ड्रग्ससह चरसचा साठा आढळून आला .

सबा सैय्यद असे या महिलेचे नाव असून ती या इराणी वस्तीत राहते . पोलिसांनी तिच्याकडून एम डी ड्रग्जसह चरस हस्तगत केले. सबा कल्याणच्या आंबिवली, मोहने परिसरात एम डी ड्रग्जसह चरस विक्री करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तिने एमडी ड्रग्स आणि चरस कुठून आणले आणि ती कोणाला याची विक्री करत होती या सर्व बाजूने पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT