Family alleges medical negligence after woman develops infection following delivery surgery at KDMC Titwala Hospital. saam tv
मुंबई/पुणे

कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार! प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात इन्फेक्शन; केडीएमसी रुग्णालयावर गंभीर आरोप

KDMC Titwala Hospital Delivery Negligence Case Details: कल्याणमधील टिटवाळा येथील केडीएमसी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान चुकीच्या पद्धतीने टाके घातल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. महिलेच्या पोटात इन्फेक्शन झाल्याने वाद निर्माण झाला असून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण पूर्वेत राहणारी धनश्री सानप ही गर्भवती महिला 10 जून रोजी कल्याण पूर्व येथील शक्तीधाम रुग्णालयात प्रसुतीसाठी गेली. शक्तीधाम रुग्णालयातून तिला प्रसूतीसाठी टिटवाळ्यातील केडीएमसीच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. 14 जून रोजी या महिलेची प्रसूती झाली तिचे ऑपरेशन झाले. त्यानंतर 24 तारखेला या महिलेचे टाके काढण्यात आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिला पुन्हा पोटात त्रास सुरू झाला. जेव्हा पुन्हा ती तपासणीसाठी कल्याण पूर्व शक्तीधाम रुग्णालयात आली तेव्हा महिलेस व तिच्या नातेवाईकांना धक्काच बसला.

महिलेच्या पोटात मोठ्या प्रमाणात पू जमा झाला होता. याबाबत संबंधित डॉक्टरांनी तिला टिटवाळ्यातील डॉक्टरांनी चुकीच्या पद्धतीने टाके टाकल्याने असं घडल्याचे सांगितलं असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. याबाबत रुग्णालयातील डॉक्टर आयेशा कादरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मात्र 24 तारखेला महिलेचे टाके काढण्यात आले.

त्यानंतर आज ती महिला या ठिकाणी आली आहे. त्यामुळे या दरम्यान ती घरीच होती. तेव्हा काही इन्फेक्शन झालं असावं असं सांगितलं. तर दुसरीकडे महिलेच्या नातेवाईकांनी मात्र टिटवाळ्यातील हॉस्पिटल प्रशासनावर गंभीर आरोप केले. त्यांनीच टाके चुकीच्या पद्धतीने टाकल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. एकंदरीतच सध्या महिलेचे प्रकृती स्थिर असली तरी तिच्यावर शक्तीधाम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेला जबाबदार कोण असा सवाल तिच्या नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान KDMCच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी दीपा शुक्ल यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोलता बोलता अचनाक थांबले अन् स्टेजपासून दूर गेले; भाषणावेळी अमित ठाकरेंसोबत नेमकं काय घडलं?

Abhijeet Dipke Announcement: अभिजीत दीपके राजकारणात येणार? निवडणुकीसंदर्भात केली मोठी घोषणा

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी, संसद आवारात अवतरले मंदिरातले 'साधू', लोकसभा अध्यक्षांचा आंदोलनाला आक्षेप

दिल्लीत जंतरमंतरला अभेद्य तटबंदी, सुरक्षेसाठी 8 फूट उंच बॅरिकेड्स, भविष्यातील आंदोलनांवर नियंत्रणाची रणनीती?

पंतप्रधान मोदींची विद्यार्थ्यांना माफी, पोलीस आंदोलकांवरील गुन्हे कधी मागे घेणार?

SCROLL FOR NEXT