Kalyan News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan : JEE परीक्षा केंद्रावर गोंधळ; विद्यार्थिनीला उशिरा आल्याने प्रवेश नाकारला, २ वर्षांची मेहनत मातीमोल

Kalyan News : कल्याणमध्ये JEE परीक्षा केंद्रावर विद्यार्थिनीला आधार कार्डच्या कारणावरून प्रवेश नाकारल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. वेळेवर पोहोचूनही परीक्षा न देता आल्याने तिचे शैक्षणिक नुकसान झाले.

Alisha Khedekar

  • कल्याणमध्ये JEE परीक्षा केंद्रावर गोंधळ

  • विद्यार्थिनीला आधार कार्डमुळे प्रवेश नाकारला

  • वेळेवर पोहोचूनही परीक्षा देता आली नाही

  • पालकांनी संताप व्यक्त करत चौकशीची मागणी केली

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण पूर्वेतील कमलादेवी विद्यालय या जेईईच्या परिक्षा केंद्रावर आज मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. एका विद्यार्थिनीला आधार कार्डचे कारण देत परिक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे तिची परिक्षा देण्याची संधी हुकली. तिच्या आईसह अन्य पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच विद्यार्थिनीने दोन वर्ष केलेली मेहनत मातीमोल झाली. तिचे झालेले शैक्षणिक नुकसान कोण भरुन देणार? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

कल्याण पूर्वेतील कमलादेवी विद्यालय या शाळेत जेईईचे परिक्षा केंद्र होते. ही परिक्षा देण्यासाठी आर. एन. नेत्रा ही सकाळी ८ वाजताच पोहचली. मात्र तिला केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी त्याठिकाणी सुरक्षा रक्षकांसह केंद्र अधिकारी वर्गाने कागदपत्रांची मागणी केली. तिच्याकडे आधारकार्ड मागण्यात आले. तिच्याकडे ओरिजनल आधार कार्ड नव्हते. यावेळेस तिने नातेवाईकांकडे आधारकार्ड मागवून घेतले मात्र तोपर्यंत उशीर झाला. परिक्षा केंद्रावरील प्रमुखांनी वेळ संपल्याचे सांगत तिला परिक्षा केंद्रात प्रवेश नाकारला.

आर. एन. नेत्रा हिने सांगितले की, मी परिक्षा केंद्रावर वेळेवर पोहचली होती. तिच्याकडे आधार कार्डची ओरिजनल प्रत मागितली. ती देखील मी दिली. तरी देखील मला परिक्षा केंद्रात प्रवेश दिला नाही. मी वेळेवर आलेले नसेल तर परिक्षा केंद्रातील सीसीटीव्ही फूटेज तपासावेत. याबाबत पोलिसांकडे मदतही मागितली. मात्र पोलिसांनी दाद दिली नसल्याचं तिने म्हटलं

आर. एन. नेत्रा हिच्या आईने सांगितले की, माझ्या मुलीला जाणीवपूर्व शुल्लक कारणावरुन प्रवेश नाकारला गेला आहे. त्यामुळे तिची परिक्षा हुकली आहे. ठाण्याहून आलेले रवी मोरे हे त्यांच्या मुलीला परिक्षेसाठी कल्याणला घेऊन आले होते. त्यांनी सांगितले की, नेत्रा हिचा जाणीवपूर्वक प्रवेश नाकारला. ती मुलगी केंद्रावर वेळेत पोहचली होती. तिला हुसकावून लावण्यात आले. ही अत्यंत चुकीची बाब आहे. तिचे शैक्षणिक नुकसान झाले त्याला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : देवीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला! विरारमध्ये टँकरच्या धडकेत माय लेकीचा मृत्यू

DA Hike: खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ; DA मध्ये थेट 'इतक्या' टक्क्यांची वाढ होणार

Mobile Charger: मोबाईलचा चार्जर खराब होण्याआधी कोणती 5 लक्षणं दिसतात?

Maharashtra News Live Update: रत्नागिरी शहरात आजपासून पाणी कपात लागू

Congress Protest Live Update : दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! दुपारी दीड वाजता इंडिया आघाडी रस्त्यावर, सुप्रीम कोर्टावर महामोर्चा

SCROLL FOR NEXT