Kalyan Hospital Assault Saam
मुंबई/पुणे

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमधील शिवसेनेच्या बड्या नेत्यावर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?

Former Shiv Sena Corporator Ramesh Mhatre Booked : कल्याणमधील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दोन डॉक्टरांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणी माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि अन्य पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

Ramesh Mhatre doctor assault case : कल्याण येथील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दोन डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवजात बालकाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिल्याने संतापलेल्या म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी डॉक्टरांना मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि 'इंडियन मेडिकल असोसिएशन'ने (IMA) दिलेल्या तीव्र आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी मंगळवारी उशिरा रात्री हा गुन्हा नोंदवला.

नेमकं प्रकरण काय आहे?

रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जागा नसल्याने डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंखे यांनी एका नवजात बालकाला इतरत्र हलवण्याचा सल्ला दिला. याच कारणावरून संतापलेल्या नातेवाईकांनी बोलावल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेले शिवसेना माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांवर हात उचलल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी काय सांगितले?

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टर सृष्टी बाविस्कर आणि वैभव साळुंखे यांनी नवजात शिशु अतिदक्षता विभागात (NICU) जागेच्या कमतरतेमुळे नवजात बाळाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला त्याच्या नातेवाईकांना दिला होता. सल्ल्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी नगरसेवकाशी संपर्क साधला, ज्याने कथितरित्या रुग्णालयात पोहोचून डॉक्टरांना शिवीगाळ केली आणि मारहाण केली. या घटनेत डॉ. साळुंखे जखमी झाले. केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी रात्री उशिरा पोलिसांशी संपर्क साधला, परंतु त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. सहायक पोलीस आयुक्त सुहास नेमाडे यांनी सांगितले की, तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मी महिला डॉक्टरावर हात उचलला नाही; नगरसेवक रमेश म्हात्रेंचा दावा

डोंबिवलीतील महिला डॉक्टरला झालेल्या मारहाण प्रकरणानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर अखेर माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. "घडलेल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, मात्र मी महिला डॉक्टरवर हात उचललेला नाही," असा दावा म्हात्रे यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे काही दिसत आहे, ते केवळ कॅमेरा अँगलमुळे तसे वाटत असावे. मी महिला डॉक्टरांना मारहाण केलेली नाही. आम्ही जेव्हा आमची तक्रार घेऊन गेलो होतो, तेव्हा त्या महिला डॉक्टर सतत फोनवर बोलत होत्या. आमचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्या कामात व्यस्त होत्या. त्यामुळे (लक्ष वेधण्यासाठी) मी त्यांच्या हातावर फटका मारला, असे म्हात्रे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT