KALYAN EAST HOTEL OWNER ASSAULTED BY DRUNK MEN NEAR METRO MALL, RESIDENTS DEMAND STRICT POLICE ACTION Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan : पाण्याच्या बाटलीवरून मध्यरात्री धिंगाणा, हॉटेल चालकाला बेदम मारहाण

Kalyan News : कल्याण पूर्वेतील मेट्रो मॉल परिसरात थंड पाण्याची बाटली देण्यास नकार दिल्याने काही मद्यधुंद व्यक्तींनी हॉटेल चालकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Alisha Khedekar

  • कल्याणमध्ये मॉल परिसरात मद्यधुंद व्यक्तींनी हॉटेल चालकाला मारहाण

  • थंड पाण्याची बाटली देण्यास नकार दिल्याने वाद

  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • परिसरात दारुडे आणि नशेखोरांचा वाढता उपद्रव

  • कठोर कारवाईची मागणी

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण पूर्वेतील मेट्रो मॉल परिसरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्रीच्या वेळी दारुडे आणि नशेखोरांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी गंभीर समस्या बनला आहे. वारंवार घडणाऱ्या गैरप्रकारांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, थंड पाण्याची बाटली देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून काही मद्यधुंद व्यक्तींनी एका हॉटेल चालकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्तींनी हॉटेल चालकाला मारहाण करत गोंधळ घातल्याचे दिसून येत आहे.

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, मेट्रो मॉल परिसरात रात्री उशिरापर्यंत काही जण रस्त्याच्या कडेला बसून दारू पीत असतात. मद्यधुंद अवस्थेत आरडाओरडा, शिवीगाळ आणि जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार नेहमीच घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबासह फिरणाऱ्या नागरिकांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वीही या परिसरात नशेखोरांकडून काही घरांवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली होती.

त्या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही अशा घटनांमध्ये फारशी घट झालेली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हॉटेल चालकाला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर पुन्हा एकदा मेट्रो मॉल परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची, सार्वजनिक ठिकाणी होणारे मद्यपान रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची आणि नशेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, वाढत्या तक्रारी आणि व्हायरल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मी शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायला तयार; शिवसैनिकांसमोरच उद्धव ठाकरेंचे मोठं विधान

'आमची पोरं कशाला पळवता? स्वतःच्या वांझोट्यापणावर उपचार करा'; शिवसेना पुन्हा फुटल्यावर ठाकरेंनी घेतला तिखट शब्दात समाचार

Maharashtra News Live Update: निवडणुकीआधी लाडकी बहीण.... आणि नंतर ८० लाख महिलांना अपात्र ठरवले. - उद्धव ठाकरे

शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार? उद्धव ठाकरेंनी 60 व्या वर्धापन दिनी जाहीर केली भूमिका

शिवसैनिक खचला नाही, उलट पेटलाय; भाजपच आता शिंदेसेनेत विलीन होईल की काय अशी भीती, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT