Kalyan News Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : कल्याणमधील २ सख्ख्या बहिणी बेपत्ता, घरातील दागिनेही लंपास; नेमकं काय घडलं?

Kalyan News : कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरातून दोन सख्या बहिणी दागिने घेऊन बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. विठ्ठलवाडी पोलिसांनी विविध अँगलने तपास सुरू केला असून संबंधित तरुणांची चौकशी सुरू आहे.

Alisha Khedekar

  • कल्याण पूर्वेतील दोन सख्या बहिणी दागिने घेऊन बेपत्ता

  • कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली

  • प्रेमसंबंधासह विविध अँगलने तपास सुरू

  • सामाजिक कार्यकर्त्यांकडून सखोल तपासाची मागणी

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण पूर्वमधून दोन सख्या बहिणी घरामधून दागिने घेऊन बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोन बहिणींपैकी एकीचे एका मुस्लिम तरुण अरबाज खान याच्याशी प्रेमसंबंध होते. अरबाजने या दोन बहिणींना गायब गेल्याचा संशय तरुणींचा नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. परंतू अरबाज हा घरीच असून पोलिसांनी त्याची चौकशी देखील केली आहे. या तपासादरम्यान दरम्यान एका तरुणीच्या कपड्यात एका राठोड नावाच्या तरुणाचा नंबर आढळून आला आहे. त्या नंबरच्या आधारे या दोन बेपत्ता बहिणींचा शोध विठ्ठलवाडी पाेलिस घेत आहेत. बेपत्ता तरुणी मागे लव जिहाद अँगल आहे का ? आणखीन दुसरी काही कहानी आहे, याचा खुलासा पोलिस तपासात होणार आहे.

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या दोन सख्या बहिणी अचानक बेपत्ता झाल्या. कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली. मात्र त्यांना मुली सापडल्या नाहीत. याप्रकरणी मुलींच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. तपासादरम्यान यातील एका तरुणीचा संबंध कल्याणमध्ये राहणारा तरुण अरबाज खान याच्याशी होता. अरबाजने त्या तरुणी सोबत काही गैरप्रकार केल्याचा आराेप करण्यात आला. या तरुणींच्या बेपत्ता झाल्याच्या घटनेनंतर त्यांच्या घरच्या लोकांना संशय आहे की, अरबाजनेच त्या दोघींना गायब केले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसर हे प्रकरण लव जिहादचे प्रकरण असल्याचा संशय असून पोलिसांनी त्या अँगलने तपास सुरु केला . मात्र पोलीस तपासा दरम्यान अरबाज खान हा त्याच्या घरीच आहे ही माहिती समोर आली. विठ्ठलवाडी पाेलिसांनी त्याची चौकशी केली आहे. त्या दोघींपैकी एकीसोबत माझे प्रेमसंबंध होते. आमचा ब्रेकअप झाला आहे. आत्ता आम्ही संपर्कात नाही. या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. असा जवाब अरबाज खान याने पोलिसांना दिला आहे.

दुसरीकडे पोलीस तपासात अशी माहिती समोर आली आहे की, दुसऱ्या बहिणीकडे एका राठोड नावाच्या तरुणाचा नंबर होता. राठोड याचा नंबर बंद लागत आहे. राठोड हा बेपत्ता असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अरबाज घरी असल्याने नक्की या दोन सख्या बहिणी कुठे आहेत ? या मध्ये लव जिहादचा काही अँगल आहे का ? राठोड नावाचा तरुण कोण आहे ? तो कुठे आहे ? या दोन सख्ख्या बहिणींच्या राठोड सोबत काय संबंध आहे? या दोन सख्ख्या बहिणी सोबत काय घडले? याचा तपास सध्या विठ्ठलवाडी पोलिस करीत आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास व्हावा. त्या बहिणींचा पोलिसांना शोध घ्यावा. यातील सत्य बाहेर यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ranjangaon: भीमाशंकरनंतर आता अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर बंद? काय आहे कारण?

बिबट्याला पकडताना आमदार चंद्रकांत पाटलांची स्टंटबाजी|VIDEO

पाकिस्ताननं फिरवला भिकेचा कटोरा, बुडत्या पाकला उधारीचा आधार

तरुणांच्या लग्नात भूकंपाचं विघ्न, 200 लग्नाळू तरुणांना मुलगी मिळेना

Amboli Ghat accident : आंबोली घाटात भयंकर अपघात, ट्रकच्या धडकेत दुचाकीचा चुराडा, बापाच्या डोळ्यासमोर लेकीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT