MIDC CANCELS WATER CUTS ON NOV 5 AND 12 FOR KALYAN-DOMBIVLI saam tv
मुंबई/पुणे

दिवाळीत कल्याण-डोंबिवलीकरांना मोठा दिलासा; MIDC कडून ५ आणि १२ नोव्हेंबरची पाणीकपात रद्द

KDMC Water Update : दिवाळीत कल्याण-डोंबिवलीकरांची गैरसोय होऊ नये म्हणून एमआयडीसीने जांभूळ बारवी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारी ३६ तासांची पाणीकपात रद्द केली आहे. या निर्णयामुळे सणाच्या काळात पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे.

Saam Tv

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका KDMC क्षेत्रातील २७ गावांमधील नागरिकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांची पाण्यासाठी होणारी गैरसोय टाळण्यासाठी MIDC ने आगामी ५ नोव्हेंबर आणि १२ नोव्हेंबर रोजी होणारी नियोजित पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे.

पाणीकपातीमागचे कारण

कमी झालेला पाऊस आणि 'एल-निनो'च्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. बारवी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी MIDC कडून कडक पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार एमआयडीसीच्या जांभूळ येथील बारवी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा दर आठवड्याला गुरुवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत, म्हणजेच सलग ३६ तास बंद ठेवण्यात येत होता. या निर्णयामुळे २७ गावांतील रहिवाशांचे हाल होत होते.

दिवाळीनंतर पुन्हा ३६ तासांचा बंद

सण-उत्सवाच्या दिवसांत स्वच्छता आणि इतर कामांसाठी पाण्याची गरज वाढते. ही बाब लक्षात घेऊन MIDC ने ५ आणि १२ नोव्हेंबरची ३६ तासांची कपात तात्पुरती मागे घेतली आहे. मात्र, हा दिलासा केवळ दिवाळीपुरताच मर्यादित असणार आहे. दिवाळीचा सण संपल्यानंतर दर आठवड्याला गुरुवार ते शनिवार पूर्ववत ३६ तास पाणीपुरवठा बंद राहील, असे MIDC प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन

या निर्णयाची पूर्वकल्पना सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, ग्रामपंचायती, उद्योजक आणि ग्राहकांना देण्यात आली आहे. बारवी धरणातील पाणी साठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरवणे आवश्यक असल्याने, नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा आणि पाण्याचे योग्य नियोजन करून सहकार्य करावे, असे आवाहन MIDC कडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro 4: 316 आसन क्षमता, 6 डबे; अशी असेल मुंबई ते ठाणेदरम्यान धावणारी मेट्रो, आंध्रप्रदेशच्या कारखान्यातून मेट्रो 4 चा ग्राऊंड रिपोर्ट

राष्ट्रवादीत पार्थवरून महाभारत? पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर आमदार नाराज? NCPच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Political News: मोठी बातमी! दिवाळीनंतर मोठा राजकीय भूकंप, भाजप 'या' मोठ्या पक्षासोबत युती करणार

Fact Check: दिवाळीत 10, 20, 50च्या नोटांचा तुटवडा होणार,RBIकडून लहान नोटांची छपाई कमी? काय आहे सत्य?

Maharashtra News Live Update : ऊस दरासाठी नागठाणे येथे 'स्वाभिमानी'चा रास्ता रोको; पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT