Operation All Out By Kalyan Dombivli Police Saamtv
मुंबई/पुणे

Kalyan Dombivali News: गणेशोत्सवाआधी पोलीस प्रशासन अलर्ट, कल्याण डोंबिवलीत 'ऑल आऊट ऑपरेशन'; १०० जणांविरोधात कारवाई, १० अटकेत

Operation All Out By Kalyan Dombivli Police: गणपती उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनानेही हालचाली सुरू केल्या आहेत.

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, प्रतिनिधी

Kalyan News:

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. गणपती उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनानेही हालचाली सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशन राबविले. या ऑपरेशनमध्ये १० जणांना अटक करण्यात आली आहे. तर १०० हून अधिक जणांविरोधात कारवाई करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात आले. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्यासह डिसिपी सचिन गुंजाळ, कल्याण एसीपी कल्याणजी घेटे आणि डोंबिवलीचे एसीपी सुनिल कुऱ्हाडे यांनी कल्याण डोंबिवलीत ऑल ऑपरेशन राबविले. या मोहिमेत ४३ अधिकाऱ्यांसह २३५ पोलिसांचा फौजफाटा होता.

या कारवाईत दारुबंदी अधिनियन्चे १६ गुन्हे, अंमली पदार्थ सेवानाचे १२ गुन्हे, जुगाराचे ३ गुनहे, पोलिस एनसीचे ८९ गुन्हे, मुंबई पोलीस कायद्याच्या ५८ कारवाया, सीआरपीसीच्या ११ कारवाया, मोटार वाहतूकीच्या १६४ कारवाया, हिस्ट्रीशिटर ६६ जण तपासले, हद्दपारीतील १९ जण तपासले, २६ गुंड तपासले त्यांच्या विरोधात कारवाई केली.

कारवाईमध्ये २२ हॉटेल्स, २४ लॉज, १२ बिअर बार आणि २१ ऑर्केस्ट्रा बार तपासून सगळयांचीच पोलिसांनी झाडा झडती घेतली. मोटार वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या १६४ जणांच्या विरोधात कारवाई करुन त्यांच्याकडून एका दिवसात १ लाख १४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी कारवायांना जरब बसण्यास मदत होणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या वकिलावर गुन्हा दाखल

Maharashtra Politics : बंडखोरी रोखण्यासाठी जालीम उपाय; बंडखोरांची ठाकरे बंधू कोंडी करणार?

Payal Gaming Private Video: 25 वर्षीय युट्यूबरचा 1.20 मिनिटांचा MMS व्हिडिओ व्हायरल? सोशल मीडियावर उडाली खळबळ

Konkan Tourism : माझं कोकण भारी! थंडीत 'या' ठिकाणी पिकनिक प्लान करा

Red Flag Boys: तुमच्या बॉयफ्रेंडच्याही अशा सवयी असतील तर वेळीचं व्हा सावध, नाहीतर आयुष्यभर रडालं

SCROLL FOR NEXT