KDMC RECRUITMENT EXAM Saam tv
मुंबई/पुणे

KDMC News : वाहतूक कोंडीमुळं स्वप्न उद्ध्वस्त, एक मिनिट उशीर अन् केडीएमसीच्या नोकरभरतीची परीक्षा हुकली, परीक्षार्थींचा संताप

KDMC RECRUITMENT EXAM : वाहतूक कोंडीमुळे परीक्षार्थींची केडीएमसीच्या नोकरभरतीची परीक्षा हुकली. पवई परीक्षा केंद्रावर वेळेत न पोहोचल्याने प्रवेश नाकारलागेला असल्याचं समोर आलं आहे. तसेच उमेदवारांनी पुनर्परीक्षेची मागणी केली आहे.

Alisha Khedekar

  • वाहतूक कोंडीमुळे उमेदवारांना वेळेत परीक्षा केंद्र गाठता आले नाही.

  • पवई परीक्षा केंद्रात फक्त मिनिटभर उशीर झाल्यानेही प्रवेश नाकारला गेला.

  • उमेदवारांनी केडीएमसी मुख्यालयात जाऊन पुनर्परीक्षेची मागणी केली.

  • परीक्षा केंद्र मध्यवर्ती ठिकाणी न ठेवल्याने अनेक उमेदवारांचे भविष्य अंधारात गेले

संघर्ष गांगुर्डे, कल्याण | साम टीव्ही

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध पदांकरीता नोकरी भरतीसाठी काल परीक्षा घेण्यात आली. मात्र या परीक्षेला अनेक विद्यार्थ्यांना बसता आले नाही. यामागे वाहतूक कोंडीचे कारण असल्याचं समोर आलं आहे, दरम्यान विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षेला बसता यावे यासाठी केडीएमसी मुख्यालयात धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पवई येथे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध पदांकरीता नोकरी भरतीसाठी परिक्षा घेण्यात आली. परिक्षा देणारे वाहतूक कोंडीमुळे परिक्षा केंद्रावर वेळेवर पोहचू शकले नाही. त्यांना परिक्षा केंद्राच्या आत घेण्यात आले नाही. त्यामुळे त्यांची परिक्षा हुकली आहे. त्यांना परिक्षा देण्यासाठी पुन्हा संधी द्यावी अशी मागणी नाेकर भरतीकरीता परिक्षा देऊ इच्छिणाऱ्या तरुण तरुणींनी केली आहे. त्यांनी बुधवारी केडीएमसी मुख्यालयात धाव घेतली होती.

काय म्हणाले परीक्षार्थी?

परिक्षा देण्यासाठी परिक्षा केंद्रावर पोहचलेल्या पूजा चौधरी यांनी सांगितले की, " मी कल्याणमध्ये राहते. मी केडीएमसीच्या नोकर भरतीची जाहिरात पाहून अर्ज भरला होता. त्यानुसार आज पवई येथे परिक्षा देण्यासाठी मी आले होती. पण परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी पाच मिनीटे उशिर झाला. त्यामुळे मला परिक्षा केंद्रात प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे मला परिक्षा देता आलेली नाही."

मयुर राठोड यांनी सांगितले की, " वाहतूक कोंडीमुळे परिक्षा केंद्रावर मला वेळेवर पोहचता आले नाही. परिक्षा केंद्रावर पोहचण्यास फक्त १ मिनिट उशिर झाला. तरी त्यांनी परिक्षा केंद्राच्या आत मला घेतले नाही. त्यामुळे मला परिक्षा देता आलेली नाही. हा आमच्या भवितव्याचा प्रश्न आहे."

दिव्या सपकाळ यांनी सांगितले की, "केडीएमसीच्या नोकर भरतीची परिक्षा आज होती. मात्र त्यासाठी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, बदलापूर, कर्जत, उल्हासनगर, खोपोली भागातून उमेदवार आले होते. त्यांच्याकरीता परिक्षा केंद्र पवईला इतक्या लांब न ठेवता कल्याण या मध्यवर्ती शहरात ठेवणे गरजेचे होते. वाहतूक कोंडीमुळे अनेक उमेदवार परिक्षा केंद्रावर वेळेत पोहचू शकले नाही. त्यांना परिक्षा केंद्रात शिरु दिले नाही."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

Maharashtra Politics : शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची भेट;महापालिकेची रणनिती ठरली? VIDEO

Astrology: 'या'५ राशींवर होणार धनवर्षाव, द्विद्वाद योगामुळे होतील मोठे फायदे

SCROLL FOR NEXT