KDMC च्या प्रसुतीगृहात १ दिवसाच्या बाळाचा मृत्यू; डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप

Kalyan Dombivli : केडीएमसीच्या प्रसुतीगृहात नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेला डॉक्टर, प्रसुतीगृहातील कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
kdmc hospital newborn death
kdmc hospital newborn deathsaam tv
Published On
Summary
  • कल्याण डोबिंवली महानगरपालिकेच्या प्रसुतीगृहात नवजात बाळाचा मृत्यू

  • डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप

  • पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करणार - केडीएमसीचे स्पष्टीकरण

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही, प्रतिनिधी

KDMC News : कल्याण डोबिंवली महानगरपालिकेच्या प्रसुतीगृहात एका नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केडीएमसीच्या प्रसुतीगृहात आज (७ सप्टेंबर) सकाळी आठच्या सुमारास एका नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काल (६ सप्टेंबर) तसलीमा खातून नावाच्या महिलेला कल्याण डोबिंवली महापालिकेच्या वसंत व्हॅली प्रसुतीगृहामध्ये दाखल करण्यात आले होते. प्रसूतीनंतर त्यांना एक मुलगी झाली.

kdmc hospital newborn death
Prime Minister Resign : पंतप्रधानांचा राजीनामा, सत्ताधारी पक्षात फूट पडू नये म्हणून घेतला मोठा निर्णय

जन्मानंतर बाळाला काही त्रास होत असल्याने डॉक्टरांनी ऑक्सिजनवर ठेवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर नवजात बाळाला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सकाळी त्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यावरुन बाळाच्या नातेवाईकांना गोंधळ घातला आणि बाळाचा मृत्यू हा केडीएमसीच्या रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप केला आहे.

kdmc hospital newborn death
Pune : पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉर, NCP नगरसेवकाच्या हत्या प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा खून

बाळाच्या मृत्यूनंतर बाळाचे वडील अजरुद्दीन मनसुरी यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी कल्याण डोबिंवली महानगरपालिका प्रशासनाशी या घटनेसंदर्भात संपर्क केला. बाळाचा पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल असे स्पष्टीकरण आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिले आहे.

kdmc hospital newborn death
Maharashtra : नेत्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला, समर्थकांनी हल्लेखोरांचे घर फोडले, कार जाळली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com