"Water supply in Kalyan-Dombivli to be halted on July 1 for 7 hours due to NRC-2 feeder repairs at Tata Power’s Kamba substation – KDMC urges residents to conserve water." Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

Water Cut : भर पावळ्यात कल्याण-डोंबिवलीकरांवर पाण्याचं संकट, मंगळवारी पाणीकपात

Kalyan water cut : कल्याण-डोंबिवलीमध्ये १ जुलै रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. टाटा पॉवरच्या दुरुस्तीमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, पालिकेने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Namdeo Kumbhar

Kalyan-Dombivli Faces Water Cut : मुंबईसह उपनरगात मे आणि जून महिन्यात मुसळधार पाऊस कोसळला. धो धो पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झालं होतं. कल्याण डोंबिवलीतही पावसाने धुमाकूळ घातला होता. मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगराला पाणीपुरवठा करणारी धरणातील पाठीसाठा वाढला आहे. भर पावसाळ्यात कल्याण आणि डोंबिवलीकरांवर पाणीकपातीचे संकट ओढावलं आहे. एक जुलै रोजी कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत पाणीकपातीचं संकट ओढावलं आहे. महावितरणकडून विद्युत पुरवठा केल्या जाणाऱ्या टाटा पॉवर कांबा उपकेंद्रातील एनआरसी – २ फिडरच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी पाणीपुरवठा बंद केला जात आहे.

टाटा पॉवरच्या कांबा येथील विद्युत उपकेंद्रातील एनआरसी-२ फिडरच्या दुरुस्तीमुळे कल्याण-डोंबिवली परिसरातील पाणीपुरवठ्यावर सात तास खंड पडणार आहे. या उपकेंद्रामार्फत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नेतिवली आणि मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्रांना वीजपुरवठा होतो. त्यामुळे मोहिलीतील १५० दशलक्ष लिटर आणि १०० दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रांचा पाणीपुरवठा बंद राहील.

याचा परिणाम कल्याण ग्रामीणमधील मांडा, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, मोहने आणि आसपासच्या गावांवर होईल. तसेच, कल्याण पश्चिमेतील ब प्रभागातील मिलिंदनगर, योगीधाम, चिकनघर, बिर्ला महाविद्यालय परिसर, म्हाडा वसाहत, मुरबाड रस्ता आणि डोंबिवली पूर्व व पश्चिमेतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम होणार आहे. महावितरणने याबाबत पालिकेला पत्राद्वारे कळवले आहे.

गेल्या दोन-तीन महिन्यांत कांबा उपकेंद्रात यापूर्वी दोनदा दुरुस्तीची कामे झाली असून, त्यावेळीही पाणीपुरवठा खंडित झाला होता. नागरिकांना या कालावधीत पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : मुंबईसह कोकणात पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी | VIDEO

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज फक्त ३४० रुपये गुंतवा अन् ७ लाख मिळवा

Kalyan Breaking : परप्रांतीय गोकूळने लाथा-बुक्क्यांनी मारलं, मराठी तरूणीला पॅरालिसिसचा धोका, डॉक्टरांची धक्कादायक माहिती

Maharashtra Live News Update: भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई ३ दिवस अमरावतीच्या दौऱ्यावर

Kalyan : हप्ते वसुली, दरोडा अन् मारहाण; मराठी तरुणीला मारणाऱ्या परप्रांतीय गोकुळचा कच्चाचिठ्ठा उघड

SCROLL FOR NEXT