Kalyan News: कल्याण डोंबिवलीमध्ये अतिधोकायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर,  रहिवाशांना हवा भोगवाटा प्रमाणपत्र
Kalyan News: toi
मुंबई/पुणे

Kalyan News: कल्याण डोंबिवलीमध्ये अतिधोकायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर, रहिवाशांना हवा भोगवाटा प्रमाणपत्र

Bharat Jadhav

अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी

कल्याण डोंबिवलीतील अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय . दोन दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेकडील मौलवी कंपाऊंड येथील अति धोकादायक इमारतीचा गॅलरीचा मोठा भाग कोसळला होता .यानंतर महापालिकेने ही इमारत खाली रिकामी करण्याचे निर्देश रहिवाशांना दिले होते.

या इमारतीमध्ये एकूण 75 कुटुंब वास्तव्यास होती. मात्र जोपर्यंत आम्हाला भोगवटा पत्र व आमच्या तात्पुरत्या पुनर्वसनाबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इमारत रिकामी करणार नाही असा इशारा या नागरिकांनी दिलाय. आज काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी याचे नेतृत्व त्या नागरिकांनी महापालिकेत अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना भेटू दिलं नसल्याचा आरोप त्यांनी केलाय

मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना भेटू दिलं नसल्याचा आरोप त्यांनी केलाय .तर याबाबत महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांनी इमारत रिकामी केल्याशिवाय भोगववाटा प्रमाणपत्र देता येत नाही ,इमारत रिकामी केल्यानंतर तात्काळ त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना भोगवाटा प्रमाणपत्र देण्यात येईल असे सांगितले .

कल्याण डोंबिवली शहराच्या पश्चिम परिसरातील मौलवी कपाऊंड येथील अतिधोकादायक इमारतीचा सज्जाचा काही भाग कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेत एक मुलगी आणि तिची आई जखमी झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच महापालिका, अग्नीशमन दल आणि पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

या धोकादायक इमारतील नागरीकांचे अन्य ठिकाणी स्थलांतर केले जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मौलवी कंपाऊंड ही धोकादायक इमारत आहे. या इमारतीला महापालिकेने यापूर्वीच नोटिस दिली आहे. एक इमारत तळ अधिक चार मजली आहे. तर दुसरी इमारत तळ अधिक एक या स्वरुपाची आहे.

या इमारतीत ७५ घरे आहेत. या ठिकाणी बहुतांश लोक भाडेकरु आहेत. या इमारतीची देखभाल दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तळ अधिक चार मजली असलेल्या धोकादायक इमारतीच्य चौथ्या मजल्यावरचा सज्जा कोसळला. इमारतीच्या खालून जात असलेल्या मेहरुनिसा आणि त्यांची मुलगी तस्मीया या जखमी झाल्या होत्या. या घटनेची दखल घेत उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी या कुटुंबियांना अन्यत्र स्थलांतरीत केले जाईल. त्यांना भोगवटा दिले जाईल असे सांगितले होते. त्यांच्या या आश्वासना पश्चात ४१ कुटुंबियांनी त्यांचे घर खाली केले. त्यांना भोगवटा प्रमाणपत्र दिले गेले नाही.

ते पाहून अन्य कुटुंबियांनी त्यांची घरे खाली केली नाहीत .इमारत अतिधोकादायक असल्याने त्या ठिकाणी कुटुंबिय जीव मुठीत धरुन राहत आहे. भोगवटा प्रमाणपत्र मिळावे यासाठी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भेट घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुरक्षकांनी त्यांना पिटाळून लावल्याचा आरोप रहिवाशांनी केला.यावेळी बोलताना रहिवाशांनी. या आधी एक वर्षापूर्वी अशाच एका इमारतील घरे खाली केली गेली. त्यांनाही भोगवटा प्रमाण पत्र दिले नाही. त्यामुळे लोक घरे खाली करीत नाहीत .

जोपर्यंत बोगोटा प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही घर सोडणार नाही असा इशारा महापालिका प्रशासनाला दिलाय त्यामुळे या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अहिराणी वर आलाय.यासंदर्भात महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांनी सांगितले की, ही इमारत अतिधोकादाक आहेत. या आधीच या रहिवाशांना इमारत रिकामी करण्याचे सूचना करण्यात आल्या होत्या संबंधित नोटीस देखील त्यांना पाठवण्यात आल्या होत्या .

दुर्घटना घडल्यानंतर संबंध इमारतीमधील रहिवाशांना इमारत रिकामी करण्याच्या सूचना केल्यात मात्र अद्याप त्यांनी घरे रिकामी केले नाहीत जोपर्यंत नागरीक घरे खाली करीत नाही. तोपर्यंत भोगवटा प्रमाणपत्र देता येत नाही. इमारत रिकामी करताच तत्काळ त्यांना भोगवता प्रमाणपत्र देण्यात येईल असे सांगितले तसेच नागरिकांनी इमारत रिकामी करून महापालिकेला सहकार्य करावे असं आवाहन केलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Health: मधुमेहींनो, आहारात हे ५ पदार्थ खा, साखर नियंत्रणात राहिल

Atal Seva Kendra Bharti 2024: 12 वी झालेल्यांना सरकारी नोकरीची संधी,अर्ज करण्यासाठी उरले अवघे काही दिवस

Team India: वर्ल्डकपनंतर टीम इंडियाला 'चक्रीवादळाने' घेरलं; भारतात केव्हा परतणार? मोठी अपडेट आली समोर

Maharashtra Live News Updates : मागासवर्गीय समाजांची मते वळवण्यासाठी भाजपकडून मोर्चे बांधणी सुरु

Natural Hair Dye : केस पांढरे झाल्याने टेन्शन आलंय? मग लोखंडी कढईत घरीच बनवा गावरान हेअर डाय

SCROLL FOR NEXT