कोरोना काळात मुंबई महानरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अनेकवेळा केला जातो. हा आरोप राजकीय असल्याचं म्हटलं जातं, परंतु आरटीआयच्या प्रश्नावर मिळालेल्या उत्तरामुळे घोटाळ्याचे होणार आरोप खरे आहेत का असा प्रश्न विचारला जातोय. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारातून कोविड काळात ४ हजार कोटी रुपयांच्या खर्चाची माहिती विचारली होती. या खर्चाची तपशील पालिकेकडे नसल्याची माहिती समोर आलीय. (Latest News)
मुंबईतील एका कार्यक्रमात पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल कोविड काळात ४ हजार कोटींचा खर्च करण्यात आल्याचा दावा केला होता. पण कोविड काळातील ४ हजार कोटींचा खर्चाचा तपशील पालिकेकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या उत्तरातून समोर आलीय. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिका आयुक्त कार्यालयात अर्ज करत कोविड काळात करण्यात आलेल्या ४ हजार कोटींचा खर्चाबाबत सादर अहवालाची प्रत मागितली होती.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आयुक्त कार्यालयाने गलगली यांचा अर्ज उप प्रमुख लेखापाल ( आरोग्य) यांच्याकडे हस्तांतरित केला. उप प्रमुख लेखापाल ( आरोग्य) लालचंद माने यांनी अहवालाची प्रत उपलब्ध नसल्याचे सांगत अर्ज उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) यांच्याकडे हस्तांतरित केला. प्रशासकीय अधिकारी चि. गे. आढारी यांनी अर्ज प्रमुख लेखापाल ( वित्त) यांच्याकडे हस्तांतरित केला. लेखा अधिकारी राजेंद्र काकडे यांनी माहिती उपलब्ध नसल्याचे सांगत त्यांनी हा अर्ज पुन्हा उप प्रमुख लेखापाल ( आरोग्य) यांच्याकडे हस्तांतरित केला. दरम्यान कोविड काळातील खर्चाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी अनिल गलगली यांनी केलीय.
मुंबई महापालिकेवर घोटाळ्यांचा आरोप
दरम्यान कोरोना काळात खिचडी घोटाळा देखील झाल्याचा आरोप केला जातोय. स्थालांतरित मजुरांना जेवणासाठी व्यवस्था करण्यासाठी महापालिकेने काही कंपन्यांना कंत्राट दिला होता. त्यात घोटाळा झाल्याचा आरोप केला जात असून त्याची चौकशी केली जाते. तर कोविड सेंटर परवानगीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होतोय.
कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा झाल्याचं म्हटलं जातंय. तर मुंबई महापालिकेने कोरोना काळात खरेदी केलेल्या डेड बॉडी बॅग खरेदी प्रकरणी ईडीने मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची चौकशी झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.